Athiya सोबत डान्स करतानाचा फोटो शेअर करत भावूक झाला सुनिल शेट्टी..म्हणाला,'हिचा जन्म झाला तेव्हापासनं..'

सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी हिनं काही दिवसांपूर्वीच क्रिकेटर केएल राहूलसोबत आपली लग्नगाठ बांधली आहे.
Suniel Shetty & Athiya Shetty
Suniel Shetty & Athiya ShettyInstagram

Suniel shetty emotional post for daughter athiya : सुनिल शेट्टीची मुलगी अथियाचा विवाह क्रिकेटर केएल राहूल सोबत नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला. आता लग्नाच्या चार-पाच दिवसानंतर अथियाचे वडील अभिनेता सुनिल शेट्टीनं एका फोटोसोबत भावूक पोस्ट शेअर केली आहे.

अथिया आणि सुनिल या फोटोत एकत्र डान्स करताना दिसत आहेत. हा फोटो अथियानं देखील शेअर केला आहे. आता सुनिल शेट्टीनं हा फोटो शेअर करत मुलीविषयीच्या आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

बोललं जातंय की लग्नाच्या दिवशी अथियाला नववधूच्या रुपात पाहून सुनिल शेट्टीला आपले अश्रू अनावर झाले होते.(Suniel shetty emotional post for daughter athiya shetty)

Suniel Shetty & Athiya Shetty
Sameera Reddy: 'बॉलीवूडमध्ये 10 वर्षांपूर्वी 'हे' सर्रास घडत होतं..', समीरा रेड्डीचा खुलासा हैराण करणारा

सुनिल शेट्टीनं अथियासोबत डान्स करतानाचा लग्नसोहळ्यातील एक फोटो शेअर करत लिहिलं आहे की,''ज्या दिवशी तुझा जन्म झाला अगदी तेव्हापासून तुझ्या तालावर मी नाचतोय आणि आज तु मला तुझ्यासोबत गाण्यावर पाय थिरकवायला लावलेस. माझ्या लाडके तुला खूप सारं प्रेम. कायम खूश रहा''. अथियानं सुनिल शेट्टीच्या या पोस्टवर कमेंट बॉक्स मध्ये हार्ट इमोजी शेअर केलं आहे.

सुनिल शेट्टीच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी देखील प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'मी एका बापाचं प्रेम समजू शकतो'. तर आणखी एकानं लिहिलं आहे की,'असा बाप सगळ्यांना मिळो'. तर आणखी एकानं कमेंट केली आहे की,'अण्णा सर एक वडील म्हणून मुलीशी कसं नातं जपलं पाहिजे याची प्रेरणा तुझ्याकडून मिळते'.

हेही वाचा: T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Suniel Shetty & Athiya Shetty
Abdu Rozik: बाथटबमध्ये कपडे धुताना अब्दूनं केली 'ही' मोठी चूक..लोकांनी पाहताच सुरु केला ट्रोलिंगचा मारा

याआधी सुनिल शेट्टीनं अथियाचे लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. अथियाच्या डोक्यावर अक्षता पडल्यानंतर सुनिल शेट्टीनं स्वतःच्या हातानं मीडियाला मिठाई वाटली होती. के.एल,राहूल आणि अथिया शेट्टीचं लग्न २३ जानेवारी रोजी सुनिल शेट्टीच्या फार्महाऊसवर झालं होतं. हा लग्नसोहळा कुटुंबिय आणि काही मोजक्याच मित्रपरिवाराच्या उपस्थितीत झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com