Sunny Deol : निर्मात्याचा सनी देओलवर चक्क फसवणुकीचा आरोप; म्हणाला, भरमसाठ शुल्क घेतले पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sunny Deol Cheating News

Sunny Deol : निर्मात्याचा सनीवर फसवणुकीचा आरोप; म्हणाला, भरमसाठ शुल्क घेतले पण...

Sunny Deol Cheating News बॉलिवूड अभिनेता सनी देओलवर निर्माता सुनील दर्शनने गंभीर आरोप केला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत सुनीलने सनी देओलसोबतच्या बिघडलेल्या नात्याबद्दल सांगितले. ‘सनी देओलने (Sunny Deol) फसवणूक (Cheating) केली. एका चित्रपटासाठी भरमसाठ शुल्क घेऊन चित्रपट केला नाही’ असा आरोप निर्माता सुनील दर्शनने केला आहे.

‘चित्रपटाला योग्यप्रकार न करताच सोडावा लागला होता. कारण की सनी देओल मध्यंतरीच लंडनला गेला होता आणि परत आलाच नाही’, असे सुनील दर्शनने आरजे सिद्धार्थ कन्नन याच्याशी बोलताना सांगितले. सनीने मला त्याच्या करिअरच्या पुढच्या टप्प्यात मदत करेन असे वचन देण्यास भाग पाडले होते, असेही सुनील दर्शन म्हणाला.

हेही वाचा: Brahmastra : जगभरातील बॉक्स ऑफिसवर ब्रह्मास्त्रचा दबदबा; जमवला ३०० कोटींचा गल्ला

‘यासाठी मी माझे संपूर्ण वर्ष दिले. त्याने मला वचन दिले होते की माझ्या दुसऱ्या चित्रपटात काम करेल. त्याने हा चित्रपट साईनं केला होता आणि त्यासाठी पैशांचा व्यवहार झाल्याची चर्चा होती. सनी देओल (Sunny Deol) भारतात परतला तेव्हा वाटले की चित्रपट करेल. परंतु, असे झाले नाही’, असेही सुनील दर्शन म्हणाला.

सनी देओलचा हेतू संशयास्पद

सनी देओलने आपल्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. तसेच चित्रपटाच्या विषयावर काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले होते. यानंतर सनी देओलचा हेतू संशयास्पद (Cheating) वाटला, असे सुनील म्हणाला.

हेही वाचा: सनी लिओनी बहुरंगी बिकिनीमध्ये दिसली समुद्रकिनाऱ्यावर

या चित्रपटाने अक्षयचे नशीब बदलले

सुनील दर्शन ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहेत तो ‘जानवर’ होता. या चित्रपटात सनी देओलची जागा अक्षय कुमारने घेतली होती. हा चित्रपट अक्षयच्या करिअरमधला गेम चेंजर ठरला. सनी देओल आणि सुनील दर्शन यांनी अजय, लुटेरे आणि इंटकम सारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे. सनी देओल लवकरच ‘चुप: रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय सनी देओलकडे ‘गदर २’ हा चित्रपटही आहे. यामध्ये तो पुन्हा एकदा अमिषा पटेलसोबत दिसणार आहे.

Web Title: Sunny Deol Actor Producer Cheating Accusations

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ActorSunny Deol