Brahmastra : जगभरातील बॉक्स ऑफिसवर ब्रह्मास्त्रचा दबदबा; जमवला ३०० कोटींचा गल्ला

ब्रह्मास्त्रने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक तब्बल ३६ कोटींची कमाई केली होती
Brahmastra Box Office Collection News
Brahmastra Box Office Collection NewsBrahmastra Box Office Collection News

Brahmastra Box Office Collection News रणबीर कपूर (Ranbir Kapoor) व आलिया भट्ट (Alia Bhatt) यांची मुख्य भूमिका असलेला ब्रह्मास्त्र चित्रपट चांगलाच चालत आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपट चांगली कमाई करीत आहे. ९ सप्टेंबरला प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने आतापर्यंत ३०० कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटावर बहिष्कार घालण्यासाठी मोहीम राबवण्यात आली होती, हे विशेष...

तरण आदर्शसारख्या समीक्षकांनी हा चित्रपट निराश करणारा आहे असे मत नोंदवले होते. असे असतानाही ब्रह्मास्त्र चित्रपटाने ३०० कोटींचा गल्ला जमवणे हे या चित्रपटाच्या सगळ्या टीमसाठी आनंदाची बाब म्हणावी लागेल. करण जोहरने चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे.

Brahmastra Box Office Collection News
सनी लिओनी बहुरंगी बिकिनीमध्ये दिसली समुद्रकिनाऱ्यावर

ब्रह्मास्त्र चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आलेल्या काही बिग बजेट चित्रपटांना बहिष्काराच्या मोहिमेमुळे मोठा फटका बसला होता. आमिर खान आणि करीना कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट फ्लॉप झाला. मात्र, यावर चित्रपट समीक्षकांची वेगवेगळी मते होती. यामुळे ब्रह्मास्त्रचे काय होणार? याकडे बॉलिवूडचे लक्ष लागले होते.

ब्रह्मास्त्र चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक तब्बल ३६ कोटींची कमाई केली होती. चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्याव्यतिरिक्त अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉय यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण हे या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत.

Brahmastra Box Office Collection News
Money Laundering Case : जॅकलीनला करायचे होते सुकेशशी लग्न; नोराने तोडला होता संपर्क

पहिल्या वीकेंडमध्ये जगभरातील बॉक्स ऑफिसवर २०० कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या ब्रह्मास्त्रने आणखी एक टप्पा पार केला आहे. चित्रपटाच्या एकूण कलेक्शनने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ब्रह्मास्त्रच्या निव्वळ कलेक्शनबद्दल बोलायचे तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर नेटची कमाई २९० कोटींपेक्षा थोडी जास्त आहे.

भारतात सर्वोत्तम कमाई

भारतीय बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ३६ कोटींची कमाई करणाऱ्या ब्रह्मास्त्रने सुरुवातीच्या वीकेंडमध्ये म्हणजेच पहिल्या ३ दिवसांत १२४ कोटींहून अधिक कमाई केली. गुरुवारी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला पहिला आठवडा पूर्ण केला आणि पहिल्या ७ दिवसांत चित्रपटाने जवळपास १७३ कोटींची कमाई केली आहे. पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने १५६ कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. ब्रह्मास्त्रच्या तेलुगू व्हर्जनने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे, ही बॉलिवूडसाठी एक चांगली बातमी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com