कोण आहे सनी देओलची होणारी सून? जाणून घ्या द्रिशा रॉय संदर्भात सर्वकाही

धर्मेंद्रचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओल सध्या सिनेमामुळे नाही तर द्रिशा रॉयसोबतच्या त्याच्या नात्यामुळं भलताच चर्चेत आहे.
Sunny Deol's son Karan Deol engaged to Bimal Roy's great granddaughter Drisha,Who is Drisha Roy?
Sunny Deol's son Karan Deol engaged to Bimal Roy's great granddaughter Drisha,Who is Drisha Roy?Google
Updated on

धर्मेंद्रचा(Dharmendra) नातू आणि सनी देओलचा(Sunny Deol) मुलगा करण देओल(Karan Deol) सध्या सिनेमामुळे नाही तर त्याच्या लग्नामुळं भलताच चर्चेत आहे. एकदम बातमी येऊन धडकली की करण देओलनं द्रिशा रॉयशी(Drisha Royy) गुपचूप साखरपुडा केला आहे. धर्मेंद्रची तब्येत गेल्या काही दिवसांत बिघडलेली होती,त्यांना हॉस्पिटलमध्ये देखील दाखल केलं होतं. पण त्यानंतर त्यांनी आपण ठिक असल्याचं सांगितलं होतं. पण म्हटलं जातंय की धर्मेंद्र यांच्या नरम-गरम असणाऱ्या तब्येतीमुळेच करण आणि द्रिशानं लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Sunny Deol's son Karan Deol engaged to Bimal Roy's great granddaughter Drisha,Who is Drisha Roy?
The Archies Teaser: सुहाना खान,खुशी कपूर,अगस्त्य नंदा;'द आर्चिज' फर्स्ट लूक

अर्थात अद्याप या दोघांकडूनही यावर अधिकृतरित्या बोललं गेलेलं नाही. या बातमीत काही तथ्य नसल्याचं सध्या तरी बोललं जात आहे. पण सध्या लोकांना हे जाणून घेण्यात इंट्रेस्ट आहे की सनी देओलचा मुलगा जिच्याशी लग्न करतोय ती द्रिशा कोण आहे? तर मग चला जाणून घेऊया देओल कुटुंबाच्या होणाऱ्या सुनेविषयी.

मीडिया रिपोर्ट्सनुसार द्रिशा एक फॅशन डिझायनर आहे. तिचं स्वतःचं यू ट्युब चॅनल आहे,जिथे ती तिचे खूप व्हिडीओ पोस्ट करत असते. ती या व्हिडीओजच्या माध्यमातून तिच्या सगळ्या अपडेट्स शेअर करीत असते. मग ती अगदी कोणत्या समारंभात जात असू दे किंवा ट्रॅव्हलसाठी ती आवर्जुन ते व्हिडीओ तिच्या चॅनलवर पोस्ट करताना दिसते. द्रिशा सोशल मीडियावर भलतीच सक्रिय पहायला मिळते. तिनं इन्स्टाग्रामवर तिची पहिली व्हिडीओ पोस्ट २०१९ साली शेअर केली होती. ती अनेक ब्रॅन्ड्सना आपल्या व्हिडीओजच्या माध्यमातून प्रमोट करतानाही दिसते.

द्रिशा रॉयचं इन्स्टाग्राम अकाऊंट चेक केलं तर कळतं की भले ती फॅशन डिझायनर असली तरी मेकअप करण्यातही ती एक्सपर्ट आहे. पण याव्यतिरिक्तही तिचे सिने इंडस्ट्रीशी खूप जवळचं नातं आहे. ती हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध फिल्ममेकर बिमल रॉय यांची नात आहे.

बिमल रॉय म्हणजे 'दो बीघा जमीन','परिणीता','बिराज बहू','देवदास','मधूमति','सुजाता','बंदिनी' अशा गाजलेल्या सिनेमांचे दिग्दर्शक. बोललं जातं की, धर्मेंद्र आणि बिमल रॉय यांच्यात खूप घट्ट मैत्री होती. सिने इंडस्ट्रीतील स्ट्रगल दरम्यान धर्मेंद्र बिमल रॉय यांना भेटण्यास एकदा गेले होते आणि त्यांच्याकडे काम मागितलं होतं. त्यानंतर बिमल रॉय यांनी धर्मेंद्र यांना फक्त सिनेमात काम दिलं नाही तर 'ही-मॅन' सारखी धर्मेंद्रना मिळालेली ओळख ही बिमल रॉय यांचीच देण आहे. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से गाजले आणि ही मेत्री पक्की होत गेली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com