'आमदार निवास'मध्ये सनी लियोनी! 'शांताबाई' गाण्यावर थिरकणार

सात वर्षांपूर्वी शांताबाई या गाण्यानं अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं
Sunny Leoni_Aamdar Niwas Movie
Sunny Leoni_Aamdar Niwas Movie

मुंबई : सुंदर आणि बोल्ड बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनीनं बॉलीवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केल्यानंतर आता तिनं प्रादेशिक सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला आहे. तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर सनी आता मराठीतील आणखी एका गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. संजीव कुमार राठोड निर्मित आणि दिग्दर्शित मराठी चित्रपट 'आमदार निवास'मध्ये 'शांताबाई' या लोकप्रिय मराठी गाण्यावर ती आयटम सॉंग करताना दिसणार आहे. (Sunny Leone staring in Aamdar Niwas Movie item dance play on famous Shantabai song)

सनीने यापूर्वी 'बॉईज' या मराठी चित्रपटामध्ये 'कुठं कुठं जायच हनिमूनला' या आयटम सॉंगद्वारे मराठी प्रेक्षकांची मन जिंकली होती. यानंतर आता ती लवकरच 'आमदार निवास' या चित्रपटात झळकणार आधुनिक 'शांताबाई' च्या रूपानं भेटणार आहे. मराठी रसिकांना सनीच्या गाण्याची प्रतीक्षा आहे.

सन २०१५ मध्ये शांताबाई या गाण्याने महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकुळ घातला होता. आतापर्यंत युट्युबवर या गाण्याला ८५ कोटींहून जास्त व्ह्यूज असून यामध्ये महाराष्ट्राची आधुनिक 'शांताबाई' म्हणून सनी लियोनी दिसणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर विष्णू देवा यांनी या आयटम साँगचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. तर संजय लोंढे यांच मूळ गीत असलेलं हे गाणं नितीन सावंत यांनी पुर्ननिर्मित करून या गाण्याला आधुनिक टच दिला आहे.

'आमदार निवास' हा चित्रपट सत्य घटनेवर प्रेरित असून सामाजिक दृष्टया दुर्लक्षित अशा विषयावर भाष्य करतो. सामाजिक आणि राजकीय गोष्ट सांगणारा हा चित्रपट लवकरच प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com