दीपिकानंतर सनी 'भगव्या' बिकीनीत! नेटकरी म्हणाले, बाई तुझा विषयच वेगळा|Pathaan Bikini row | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pathaan Bikini row

Pathaan Bikini row: दीपिकानंतर सनी 'भगव्या' बिकीनीत! नेटकरी म्हणाले, बाई तुझा विषयच वेगळा

Sunny Leone trolled after deepika padukone saffron bikini trollers: पठाणचं बेशरम रंग नावाचे गाणे व्हायरल झाले आणि दीपिकाच्या नावानं नेटकऱ्यांनी ओरड सुरु केली. तिनं भगव्या रंगाचीच बिकीनी का घातली, तिला हिंदू धर्माचा अपमान करायचा होता का, असे वेगवेगळे प्रश्न यानिमित्तानं नेटकऱ्यांनी दीपिकाला विचारले आहेत. मात्र यासगळ्यात सनी लियोनी ट्रोल होताना दिसत आहे.

दीपिकाची बिकीनी व्हायरल होताच आता बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींचे देखील बिकीनीमधील फोटो व्हायरल होत आहेत. त्यात सनीच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. त्यावर आलेल्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या खास चर्चेचा विषय ठरताना दिसत आहेत.

ट्रोलर्सनं केली धुलाई....

सनीचा तो व्हिडिओ व्हायरल होताच त्यावरुन नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. सनीच्या व्हिडिओ किंवा फोटोंना मिळणाऱ्या प्रतिक्रिया या नेहमीच भन्नाट असतात. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, सनी तुझा विषयच वेगळा आहे. मुळात तुझी आणि दीपिकाची तुलना होऊ शकत नाही. काहींनी तर सनी तू देखील भगव्या रंगाचा अपमान केला आहेस. आमच्या भावनांशी तू खेळ केला आहेस. त्याचा अपमान तू केला आहे. अशा प्रतिक्रिया सनीला दिल्या आहेत. सनीनं देखील तिच्या त्या फोटोला लक्षवेधी कॅप्शन्स दिले आहे.

हेही वाचा: Viral Video : झोप पिल्ल्या झोप! बाळाला गिटारवर झोपवत बापाने गायली लेकासाठी लोरी

सनी लियोनीचे चित्रपट -

गेल्या काही वर्षांपासून सनी लियोनीचा बॉलीवूडमधील वावर वाढला आहे. तिनं वेगवेगळ्या जॉनरमधील चित्रपट केले आहेत. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. सनीचा ड्रेस सेन्स हा चाहत्यांच्या खास चर्चेचा विषय. तिला त्यावरुन प्रतिक्रियाही मोठ्या दिलखुलासपणे मिळताना दिसतात. मोनोक्रोम, बिकीनीच्या लूकमध्ये तिच्या फोटोंना मिळालेला प्रतिसाद आणि प्रतिक्रिया भन्नाट आहे.

हेही वाचा: Deepika trolled fifa: मोठ्या तोऱ्यात गेली दीपिका ट्रोल झाली, नेटकऱ्यांनी झाडलं! 'तुला तर...'

सनी लियोनीनं जिस्म २, हेट स्टोरी, रागिनी एमएमएस २ आमि एक पहेली लीला सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. बॉलीवूडमध्ये सनी लियोनीला कास्ट करणे ही आता निर्मात्यांच्या दृष्टीनं मोठी बाब आहे.