esakal | “कोण विजयी होणार? हा सस्पेन्स आता माझा जीव घेईल.”
sakal

बोलून बातमी शोधा

sunny news on us election

सनी लिओनी ही बॉलिवूड सिनेसृष्टीत जरी काम करत असली तरी देखील ती मुळची अमेरिकन नागरिक आहे. हॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांनी मतदान केल्यानंतर स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.  

“कोण विजयी होणार? हा सस्पेन्स आता माझा जीव घेईल.”

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - प्रसिध्द सेलिब्रेटी म्हणून सनी लिओनीचं नाव परिचित आहे. गेल्या काही वर्षांपासून ती बॉलीवूडमध्ये सक्रिय झाली आहे. तिला अनेक चित्रपटांतून आयटम साँग करण्याच्या ऑफर आल्या आहेत. याशिवाय छोट्या पडद्यावरही ती झळकली आहे. सनीचा फँन फॉलोअर मोठ्या प्रमाणात जगभर आहे. तिने नुकतेच अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी मतदान केलं. मतदान केल्यानंतर तिने एक पोस्ट इंस्टावर शेयर केली आहे.

सनी लिओनी ही बॉलिवूड सिनेसृष्टीत जरी काम करत असली तरी देखील ती मुळची अमेरिकन नागरिक आहे. चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी ती भारतात येते.  हॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकारांनी मतदान केल्यानंतर स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या सर्वांत सनी लिओनीचा फोटो मात्र सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. मी मतदान केलं आहे असं लिहिलेला असा बॅच लावून तिने हा फोटो शेअर केला. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीतील चुरस वाढली आहे. अखेर कुणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निवडणूकीत रिपब्लिकन पक्षाचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विजयी होणार की, ‘अमेरिकन ड्रीम’ म्हणजे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार व माजी उपाध्यक्ष जो बायडेन बाजी मारणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. या निवडणूकीत बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने देखील मतदान केलं. मतदान केल्यानंतर तिने आपल्या पतीसोबत एक फोटो शेअर केला. “कोण विजयी होणार? हा सप्सेंस आता माझा जीव घेईल.” असं म्हणत तिने शेअर केलेला हा फोटो चर्चेत आला आहे.

'अशावेळी बाहेरची दाल मखनी कोण खाईल का'?

अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे मतदार एक मोठी भूमिका बजावणार असल्याचं म्हटलं जात आहे. १६ राज्यांमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या अमेरिकेतील नागरिकांपेक्षाही अधिक आहे. परंतु १३ लाख भारतीय त्या आठ राज्यांमध्ये राहतात ज्या ठिकाणी चुरशीची लढत आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही पक्षाला एक मतही बहुमोल ठरणार आहे 

loading image