Kriti Affair: लपाछपी! क्रिती करतेय बड्या अभिनेत्याला डेट, जगाला सांगताना मात्र दोघेही लाजले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kriti senon dating this superstar

Kriti Affair: लपाछपी! क्रिती करतेय बड्या अभिनेत्याला डेट, जगाला सांगताना मात्र दोघेही लाजले...

Kriti Sanon: बॉलीवुडमधील तरूणांचा क्रश असणारी अभिनेत्री क्रिती हल्ली एका अभिनेत्याला डेट करत असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र हा बडा अभिनेता कोण आहे असा प्रश्नही अनेकांना पडला असेल. तसेच हा सुपरस्टार बॉलीवुडचा की टॉलीवुडचा असाही प्रश्न अनेकांना पडला असेलच.

खरं तर क्रिती सेनॉनच्या अफेअर चर्चांना करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमधील तिने केलेल्या एका कॉलमुळे आल्या आहे. नेमका तिने कोणाला कॉल केला होता? आणि कोण आहे तिला डेट करत असलेला अभिनेता? चला तर सविस्त जाणून घेऊया.

माहितीसाठी क्रिती लवकरच प्रभासच्या 'आदिपुरुष' या चित्रपटात दिसणार आहे. तसेच क्रितीने कॉफी विथ करण या शो दरम्यान प्रभासला केलेला कॉल सोशल मीडियावर चांगलाच नोटीस झाला. आदिपुरुषच्या शुटींगसेटवर पहिल्याच दिवशी क्रिती आणि प्रभासचं चांगलं बाँडिंग झाल्याचीही चर्चा होती.

या चर्चांना उधाण येताच चाहते चकीत झाले होते. कारण प्रभास हा फार लाजाळू स्वभावाचा आहे. क्रिती आणि प्रभासची मैत्री फारच खास अल्याचंही म्हटलं जातंय. या दोघांनी अजूनही त्यांच्या नात्याबाबत कुठलंही भाष्य केलं नसलं तरी त्यांच्या अफेअरच्या चर्चांना आता सोशल मीडियावर चांगलंच उधाण आलं आहे.

क्रिती आणि प्रभासची जोडी मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी चाहते उत्सुक असून त्यांच्या लव केमिस्ट्रीबाबत जाणून घेण्यासही चाहत्यांना रस आहे. क्रिती आणि प्रभासचा आगामी चित्रपट जानेवारी २०२३ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.