Ramesh Babu garu Demise: सुपरस्टार महेश बाबुच्या मोठ्या भावाचं निधन |Superstar Mahesh Babu brother Ramesh Babu passes away | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramesh babu passed away
Ramesh Babu garu Demise: सुपरस्टार महेश बाबुच्या मोठ्या भावाचं निधन

Ramesh Babu garu Demise: सुपरस्टार महेश बाबुच्या मोठ्या भावाचं निधन

टॉलीवूड (Tollywood) इंडस्ट्रीमध्ये मोठं नाव असणारा अभिनेता म्हणजे सुपरस्टार महेश बाबु (Mahesh babu). त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यानं त्याच्या अभिनयानं मोठ्या प्रमाणात चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता त्याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मोठ्या भावाचे रमेश बाबु (Ramesh Babu) यांचे निधन झाले आहे. सोशल मीडियावर (Ramesh babu passed away) काही वेळापूर्वी ही बातमी व्हायरल झाली आहे. त्यामुळे महेशच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आज पहाटे रमेश बाबु यांचे निधन झाले आहे. टॉलीवूडमध्ये प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून रमेश (Ramesh Babu garu) यांची ओळख होती.

गेल्या काही दिवसांपासून रमेश (Ghattamaneni Ramesh Babu) हे आजारी होते. 56 वर्षीय रमेश यांनी अल्पावधीतच चाहत्यांची पसंती मिळवली होती. भावाच्या निधनाची बातमी कळताच महेशला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या स्टारडममध्ये त्यांचा सर्वाधिक वाटा आहे. सध्या महेश कोरोना संक्रमित असल्यानं तो क्वॉरनटाईन झाला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रमेश बाबु हे बऱ्याच दिवसांपासून लिव्हरच्या आजारानं त्रस्त झाले होते. अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली आहे.

हेही वाचा: कोण होती गंगुबाई ? Gangubai Kathiawadi | Alia Bhatt |Bollywood Movie

रमेश बाबु यांच्या निधनानंतर टॉलीवूडमधल्या अनेक सेलिब्रेटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते राजु बीए यांनी ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून घट्टामनेनी कुटूंब मोठ्या संकटातून जात आहे. आता त्यांच्यावर काळानं मोठा घाला घातला आहे. मी त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त करतो. तसेच रमेश यांना आदरांजलीही वाहतो. रमेश यांचे जाणे आमच्या मनाला चटका लावून गेले आहे. त्यांची उणीव ही नेहमीच आम्हाला जाणवेल. एक मोठा कलाकार आपल्यातून हरपला आहे. यावेळी घट्टामेनी परिवाराकडून चाहत्यांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वैकुंठ स्मशानभूमीत गर्दी न करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. प्रख्यात अभिनेता महेश बाबुला सहा जानेवारीला कोरोना झाल्याची बातमी व्हायरल झाली होती. तो सध्या विलगीकरणात आहे.

हेही वाचा: Video: 'याचं उद्घाटन मी आधीच केलंय'; ममतांनी मोदींना थेट सुनावलं

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top