esakal | रजनीकांतच्या चित्रपटाच्या पोस्टरवर शिंपडलं 'बकरीच रक्त', थलाईवा नाराज!
sakal

बोलून बातमी शोधा

रजनीकांतच्या चित्रपटाच्या पोस्टरवर शिंपडलं 'बकरीच रक्त', थलाईवा नाराज!

रजनीकांतच्या चित्रपटाच्या पोस्टरवर शिंपडलं 'बकरीच रक्त', थलाईवा नाराज!

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - केवळ भारतातच नाही तर जगभरात रजनीकांतचे फॅन्स (superstar rajinikanth) आहेत. आपल्या वेगळ्या स्टाईलमुळे रजनीकांत हे नेहमीच लोकप्रिय ठरले आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये त्यांना देवाचा दर्जा देण्यात आला आहे. जेव्हा त्यांचा एखादा चित्रपट प्रदर्शित होणार असतो तेव्हा फॅन्स वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना लढवताना दिसून येतात. त्यांच्या फोटोला दही - दुधाचा अभिषेक हे तर नित्याचं आहे. मात्र आता त्यांच्या फॅन्सन जे काही केलं आहे त्यामुळे खुद्द रजनीकांत यांना त्यावर प्रतिक्रिया द्यावी लागली आहे. फॅन्सनं केलेल्या त्या कृत्यामुळे त्यांना वाईट वाटले आहे. त्यांनी सोशल मीडियावरुन तशी खंत व्यक्त केली आहे. आगामी काळात अन्नाथे नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्तानं त्यांच्या चाहत्यांनी आपल्या आवडत्या कलाकाराला शुभेच्छा देण्यासाठी जो प्रकार केला त्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

सुपरस्टार रजनीकांत यांच्या अन्नाथे नावाच्या चित्रपटाच्या पोस्टरवर त्यांच्या चाहत्यांनी बकरीच्या रक्ताचा अभिषेक केला आहे. त्याचे काही फोटो सोशल मीडिय़ावर व्हायरल झाल्याचे दिसून आले आहे. चाहत्यांनी पहिल्यांदा त्या बकरीला मारलं आणि तिचं रक्त पोस्टरवर शिंपडलं अशी माहिती समोर आली आहे. याप्रकारावर रजनीकांत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मला माझ्या चाहत्यांकडून अशा कृत्याची अपेक्षा नव्हती. त्यांनी जे काही केलं ते ऐकून वाईट वाटल्याचं सांगितलं आहे.

अखिल भारतीय रजनीकांत रसिकर मंदरम फॅन्स क्लबच्या सदस्यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे. ज्या प्रकारची घटना घड़ली आहे त्याचे समर्थन करता येणार नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. सोशल मीडियावर काही वेळापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात रजनीकांतचे काही चाहते बकरीला मारुन तिचं रक्त त्या पोस्टरवर शिंपडताना दिसत आहे. चाहत्यांच्या अशा प्रकारच्या हिंसक घटनेचा सोशल मीडियावरुन अनेकांनी निषेध केला आहे. रजनीकांत यांच्या लोकप्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना पहिल्यांदाच घडली आहे.

हेही वाचा: रजनीकांत यांचा राजकारणाला कायमचा रामराम, घेतला हा मोठा निर्णय

हेही वाचा: केंद्राकडून परवानगी, सुपरस्टार रजनीकांत जाणार अमेरिकेला...

loading image
go to top