
एका अज्ञात व्यक्तीने एटीएम कार्ड वापरुन तिच्या बँक अकाउंटमधून ९ हजार रुपयांची चोरी केली आहे.
मुंबई- लॉकडाऊनमुळे अनेक प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. सायबर हल्ले असो किंवा मग आर्थिक फसवणूक. असंच काहीसं घडलंय ते एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या बाबतीत. ‘दिया और बाती हम’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सुरभी तिवारी हिच्यासोबत आर्थिक फसवणूक झाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने एटीएम कार्ड वापरुन तिच्या बँक अकाउंटमधून ९ हजार रुपयांची चोरी केली आहे. या प्रकरणी तिने सायबर पोलीसांत तक्रार केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
हे ही वाचा: 'घरात माझी काही इज्जतंच नाहीये..'वरुण धवनचा'द कपिल शर्मा शो'मध्ये खुलासा
२१ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता सुरभीला एक निनावी फोन आला. या फोनवरील व्यक्तीने तिचं अकाउंट ब्लॉक झाल्याची माहिती दिली. सुरभीनं देखील अकाउंट अनब्लॉक करण्यासाठी त्याला आपल्या एटीएम कार्डवरील माहिती दिली. काही वेळाने तिच्या फोनवर एक मेजेज आला यामध्ये ९ हजार रुपये अकाउंटमधून काढले असल्याची माहिती तिला मिळाली.
यानंतर तिने लगेचच आपल्या बँकेत जाऊन तेथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यावेळी तिच्यासोबत आर्थिक फसवणूक झाल्याची घटना तिच्या लक्षात आली. त्यानंतर सुरभीनं आपलं एटीएम कार्ड ब्लॉक केलं आणि सायबर पोलिसांकडे जाऊन तक्रार केली. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. तसंच लवकरात लवकर आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल असं आश्वासनही त्यांनी अभिनेत्री सुरभीला दिलं आहे.
surbhi tiwari files fir after falling victim to an atm fraud