सुपरस्टार सूर्याचा 'सुररईपोटरू'ऑस्करच्या शर्यतीत

वृत्तसंस्था
Wednesday, 27 January 2021

हिंदी चित्रपट सृष्टीतील अनुभवी आणि प्रसिद्ध कलाकार परेश रावल यांनी या चित्रपटात खलनायकाची भूमिका केली आहे. अपर्णा बालामुर्तीने सूर्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. 

मुंबई : 'सुररई पोटरू' हा तमिळ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर 12 नोव्हेंबरला रिलीज झाला होता. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सुधा कोनगारा यांनी केलं आहे. 'सुराराई पोटरु' याचा अर्थ आहे की,  'हिंम्मत असलेल्या लोकांचे कौतुक करा'.  सुररई पोटरु हा एअर डेक्कनचे संस्थापक कॅप्टन गोपीनाथ यांचा जीवनपट आहे.

या  चित्रपटातील मुख्य भूमिका तामिळ चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार 'सूर्या' याने केली आहे. सर्वांत स्वस्त एअर लाईन्सचा बिजनेस सुरु करण्याचे स्वप्न मनात बाळगून जिद्दीने व कष्टाने गोपीनाथ येणाऱ्या समस्यांना कसे सामोरे जातात यावर या चित्रपटाचे कथानक लिहिले गेले आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील अनुभवी आणि प्रसिद्ध कलाकार परेश रावल यांनी या चित्रपटात खलनायकाची भूमिका केली आहे. अपर्णा बालामुर्तीने सूर्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या पती आणि पत्नीच्या जोडीला प्रेक्षकांची खुप पसंती मिळाली आहे.

Happy birthday bobby deol; 'आश्रममध्ये 'बाबा' होऊन 'हिरो' झाला'

सुररई पोटरू या चित्रपटाची नुकतीच ऑस्करसाठी निवड झाली आहे.  हा चित्रपट अकॅडमी स्क्रिनिंग रूममध्ये प्रदर्शित केला आहे. सुरुवातीला अकॅडमीमधील मेंबर्सला हा चित्रपट दाखवला जाणार आहे.

'आमच्या टीमला विश्वास आहे की जगभरातील कोट्यवधी चित्रपट प्रेमींवर जसा प्रभाव पडला तसाच प्रभाव हा चित्रपट ऑस्कर ज्युरीच्या सदस्यावरही पडेल'  अशी प्रतिक्रीया या चित्रपटाचे सह-निर्माते राजशेखर पंडियन यांनी दिली आहे. 

सनी चिडला,लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला; तुझा माझा संबंध संपला'

तसेच प्रजासत्ताक दिना दिवशी राजशेखर पंडियन यांनी ट्विटरवरअसे ट्विट केले कि, " प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! #सुररईपोटरू  सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर आणि इतर श्रेणींमध्ये सामान्य श्रेणी अंतर्गत ऑस्करमध्ये सामील झाला आहे! आज हा चित्रपट अकॅडमी स्क्रीनिंग रूममध्ये उपलब्ध झाला आहे." 26ऑक्टोबरला  ट्रेलर रिलीज  होता.

'शेतक-यांविषयी बोलली,घे मग; 6 जाहिरात कंपन्यांचा कंगणाला धडा'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suriya Tamil Film Soorarai Pottru Enters Oscar Race

Tags
टॉपिकस
Topic Tags: