तामिळ सुपरस्टार सूर्याला कोरोनाची लागण; उपचार सुरू

suriya
suriya

तामिळ सुपरस्टार सूर्याला कोरोनाची लागण झाली आहे. याबद्दलची माहिती खुद्द त्याने ट्विट करत चाहत्यांना दिली. 'मला कोरोनाची लागण झाली असून माझ्यावर सध्या उपचार सुरू आहेत. माझी प्रकृती ठीक आहे. आपलं आयुष्य अजूनही नॉर्मल झालेलं नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या. त्याचप्रमाणे आपण भीतीने घाबरूनही जगू शकत नाही. पण सर्वांना सुरक्षित आणि काळजीपूर्वक राहणं गरजेचं आहे', असं ट्विट सूर्याने केलं. 

कोरोनाची लस जरी आली असली तरी या विषाणूचा धोका अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेत राहणं गरजेचं आहे, असं आवाहन सूर्याने त्याच्या पोस्टद्वारे चाहत्यांना केलंय. सूर्याच्या करिअरविषयी बोलायचे झाल्यास, सध्या त्याच्या हातात बरेच प्रोजेक्ट्स आहेत. 'सूरराई पोट्रू' या चित्रपटात तो नुकताच झळकला होता. मात्र लॉकडाउनमुळे हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकला नव्हता. अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या 'नवरस' या चित्रपटाची शूटिंग त्याने नुकतीच पूर्ण केली. या चित्रपटासाठी बऱ्याच वर्षांनंतर दिग्दर्शक गौतम मेनन आणि सूर्या एकत्र काम करणार आहेत. त्यांनी यापूर्वी 'काखा काखा' आणि 'वारणम आईराम' या तामिळ चित्रपटांसाठी एकत्र काम केलं होतं. 

'नवरस' हा चित्रपट नेटफ्लिक्स आणि मणी रत्नम यांच्या संयुक्त निर्मितीने प्रदर्शित होत आहे. या चित्रपटासाठी नऊ वेगवेगळे दिग्दर्शक नऊ वेगवेगळ्या कथा प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com