सुशांतच्या चाहत्यांनी दाखल केली ऑनलाईन याचिका; पण कुणाविरुद्ध? घ्या जाणून...

online petition
online petition

मुंबई ः सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का सहन करावा लागला. सुशांतची ही आत्महत्या नसून त्यामागे वेगळेच कारण असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. बॉलिवूडमधील प्रस्थापित गटांकडून अवहेलना केली जात असल्याने सुशांतने हे पाऊल उचलल्याचे चाहत्यांचे म्हणने आहे.  
अभिनेत्री दीप्ती देवीलाही नैराश्याने ग्रासले होते; जाणून घ्या कशी केली त्यावर मात...

त्या पार्श्वभूमीवर सुशांतच्या चाहत्यांनी सलमान खान, कारण जोहरसह काही बॉलीवूड सेलिब्रिटीज व मोठ्या प्रॉडक्शन हाऊसच्या चित्रपटांचा बहिष्कार करण्यासाठी change.org या संकेतस्थळावर ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. आतापर्यंत जवळपास लाखो लोकांनी या याचिकेवर सह्या केल्या आहेत. यात लिहिले आहे की, करण जोहरचे धर्मा प्रोडक्शन, यशराज फिल्म्स, एसआरके, संजय लिला भन्साळीसह अन्य काही प्रोडक्शन असे आहेत कि यांच्या शिवाय तुम्ही बॉलीवूड मध्ये येऊ आणि टिकू शकत नाही. या याचिकेमध्ये असेही लिहिले आहे की, अॅमेझॉन प्राईम, नेटफ्लिक्स, हॉटस्टार यांनी या प्रॉडक्शन हाऊसेसच्या चित्रपटांचे प्रमोशन करू नये. 

मेहनती, स्वकर्तृवाने पुढे आलेल्यांना येथे काहीही किमत नाही काय? मक्तेदारी असणारी व्यक्तीच बॉलीवूडवर नियंत्रण कसे ठेऊ शकतात, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. करण जोहर आणि सलमान खानच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्यात यावा, असेही म्हटले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीवर जोरदार टीका करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com