esakal | "सुशांतसिंह आत्महत्या करू शकत नाही; रियाबाबत मला काही माहित नाही..!"

बोलून बातमी शोधा

सुशांतसिंह आत्महत्या करू शकत नाही; रियाबाबत मला काही माहित नाही..!

सुशांतसिंह राजपूत हा एक जिंदादिल माणूस होता. ते इतरांना नेहमी मदत करत होते. त्यामुळे तो कधीही आत्महत्या करू शकत नाही, अशी भावना सुशांतचा माजी अंगरक्षक रोनाल्ड राजू याने 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.

"सुशांतसिंह आत्महत्या करू शकत नाही; रियाबाबत मला काही माहित नाही..!"
sakal_logo
By
विजय गायकवाड : सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा :  सुशांतसिंह राजपूत हा एक चांगला माणूस होता. ते इतरांना नेहमी मदत करत होते.  त्यांनी केरळमधील पूरग्रस्तांनाही मदत केली होती. तो एक जिंदादिल माणूस होता. त्यामुळे तो कधीही आत्महत्या करू शकत नाही, अशी भावना सुशांतचा माजी अंगरक्षक रोनाल्ड राजू याने 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली.  

ही बातमी वाचली का? रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक आणि विशेष ट्रॅफिक ब्लॉक...

पालघर जिल्ह्यातील वसई पूर्व  एव्हरशाईनच्या शिव कला इमारतीत राहणारा रोनाल्ड राजू हा चार वर्ष सुशांतचा अंगरक्षक होता. रोनाल्ड राजूने म्हटले आहे की रिया चक्रवर्ती ही जॉब सोडल्यानंतर सुशांतच्या जीवनात आली. त्यामुळे रिया बाबत आपणास काही माहित नाही. 

ही बातमी वाचली का? जे.जे. रुग्णालयाचे अनोखे संशोधन; विनासंसर्ग होईल रुग्णांची ने-आण...

सुशांतसिंह हा नेहमी लोकांना मदत करणारा आणि हसत खेळत राहणारा व्यक्ती होता. चित्रपट सृष्टीत एक चांगला अभिनेता होता. त्यांच्यासोबत काम करताना खूपच आनंद झाला असल्याचेही त्याने सांगितले.
-----------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)