esakal | जे.जे. रुग्णालयाचे अनोखे संशोधन; विनासंसर्ग होईल रुग्णांची ने-आण...
sakal

बोलून बातमी शोधा

जे.जे. रुग्णालयाचे अनोखे संशोधन; विनासंसर्ग होईल रुग्णांची ने-आण...

कोरोना रुग्णाला रुग्णालयातून इतर ठिकाणी किंवा रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेताना कोरोना संसर्ग होण्याची भीती डॉक्टरांमध्ये होती. त्यासाठी एक विशेष चेंबर (कवच) तयार करण्यात आले आहे.

जे.जे. रुग्णालयाचे अनोखे संशोधन; विनासंसर्ग होईल रुग्णांची ने-आण...

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. रुग्णालयांमध्ये रूग्णांची ने-आण करताना आरोग्य सेवा कर्मचारी आणि डॉक्टरांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. दररोज देशात हजारो आरोग्य सेवा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. पीपीई कीटमध्ये बरेच तास राहून रुग्णांना आवश्यक ती आरोग्य सेवा देणे कठीण होते. यावर उपाय म्हणून जे. जे. रुग्णालयातील काही डॉक्टरांनी एक असा चेंबर बनवला आहे ज्यामुळे रुग्णातून पसरणारा संसर्ग थांबवणे सोपे होईल. 

औषधी वनस्पतींकडे वाढता कल; अनेकांनी फुलवली घरच्या घरी आयुर्वेदिक बाग...

कोरोना रुग्णाला रुग्णालयातून इतर ठिकाणी किंवा रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेताना कोरोना संसर्ग होण्याची भीती डॉक्टरांमध्ये होती. त्यासाठी एक विशेष चेंबर (कवच) तयार करण्यात आले आहे. कोरोना विषाणू प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा चेंबर उपयुक्त ठरू शकेल असं मत तज्ज्ञ डॉक्टर्स व्यक्त करतात. 'जे.जे. रुग्णालय सर्जिकल लॅब' आणि 'आयआयटी इंडोमेड' यांच्या इंजीनिअर्सच्या सहभागाने हा चेंबर तयार करण्यात आला आहे. चेंबर निर्मितीचा भारतातील हा पहिला प्रयत्न आहे. चेंबरमध्ये सुरक्षित तापमान आणि हवेशीर पेटी तयार करण्यात आली आहे. ज्यामुळे, निगेटीव्ह आणि पॉझिटिव्ह अशा दोन्ही संसर्गाला नियंत्रण करता येते. शिवाय, संसर्गाविना रुग्णाची ने-आण करणे सोपे झाले आहे. गेल्या एका महिन्यांपासून या प्रोजेक्टवर काम सुरु होते. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून या चेंबरचा वापर सुरू करण्यात आला आहे. 

पश्चिम रेल्वेचा प्रवास आता अधिक वेगवान; खार ते वांद्रे दरम्यान पूर्ण झाले महत्वाचे काम...​

कोरोना रुग्णाचा संसर्ग सुरु झाल्यानंतर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला मोठ्या संख्येने कोव्हीड रुग्ण आढळत होते. यावेळी एखाद्या घरून रुग्णाला रुग्णालयात घेऊन जाताना हेल्थ केअर कर्मचाऱ्यांनाही कोरोना संसर्ग होत होता. मात्र, गेल्या दोन महिन्यात काळजी घेतली गेल्यामुळे रुग्णाच्या वाहतुकीवेळी संसर्ग होण्याचे प्रमाण नक्कीच कमी झाले. हा धोका ओळखूनच हा चेंबर तयार करण्यात आला आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यावर त्याला घरातून रुग्णालयात आणावे लागते. 

मुंबई पुण्यातील लॉकडाऊन फसला का ? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मांडलं स्पष्ट मत...

रुग्णालयात आणल्यावर तो ओपीडीमध्ये जातो. ओपीडीमधून तो कोरोना वॉर्डमध्ये हलवण्यात येतो. वॉर्डात आणल्यावरही त्याला एक्सरे विभाग किंवा सिटी स्कॅन विभागातून गरज लागल्यास फिरवावे लागते. किंवा दुसऱ्या रुग्णालयात हलवताना रुग्णापासून इतर कर्मचारी आणि डॉक्टरांना कोरोना संसर्ग होण्याची अधिक भीती असते. यामुळेच सार्वजनिक रुग्णालयातील सर्वाधिक हेल्थ केअर कर्मचारी आणि डॉक्टर बाधित झाले आहेत. हा चेंबर वापरल्यास पीपीई किट ही वापरण्याची गरज लागणार नाही आणि संसर्गही होणार नसल्याचे जेजे रुग्णालयाचे सर्जरी विभाग प्रमुख डॉ. अजय भंडारवार यांनी सांगितले. 

हृदयद्रावक ! एकाच वेळी पोलिस दलात सहभागी झालेल्या जुळ्या भावांवर कोरोनाने एकत्रच घातला घाला...

रुग्ण वाहतूक चेंबरमध्ये दाब, तापमान, बदलते ठेवता येते. तसेच ऑक्सिजन आतमध्ये जाईल आणि कार्बनडायऑक्साइड  बाहेर पडेल अशी सोय करण्यात आली आहे. त्यासाठी हेपा फिल्टर बसवण्यात आला आहे. ज्यात अनेक प्रकारचे विषाणू बाहेर पसरणार नाही अशी सोय केली गेली आहे. परदेशात असे चेंबर 2 ते 3 लाखात तयार केले जातात. इथे मात्र तयार करताना 50 हजार खर्च आला असून जे तयार करू इच्छितात, त्यांना तांत्रिक ज्ञान नक्की दिले जाईल. ज्यातून हा संसर्ग होण्याचे प्रमाण कमी होईल. 
- डॉ अजय भंडारवार, सर्जरी विभाग प्रमुख, जे जे रुग्णालय.      

---
संपादन : ऋषिराज तायडे

loading image
go to top