Sushant Singh Rajput Death Case : सीबीआयला मिळाला मोठा पुरावा? फडणवीसांनी केला खुलासा

सुशांतच्या निधनानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी समोर आल्या होत्या. त्यातून बॉलीवूडमधील कित्येक सेलिब्रेटींना सीबीआयनं चौकशीसाठी बोलावून घेतलं होतं.
Sushant singh rajput maharashtra deputy cm devendra fadnavis
Sushant singh rajput maharashtra deputy cm devendra fadnavisesakal

Sushant singh rajput maharashtra deputy cm devendra fadnavis : बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला तीन वर्षे होऊन गेली आहेत. मात्र अजूनही त्याच्या आत्महत्येच्या तपासातून ठोस कोणतीही माहिती समोर आलेली नाही. १४ जून २०२० रोजी सुशांतनं त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. मुंबईतील त्याच्या फ्लॅटमध्ये त्यानं आत्महत्या केली होती.

सुशांतच्या निधनानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी समोर आल्या होत्या. त्यातून बॉलीवूडमधील कित्येक सेलिब्रेटींना सीबीआयनं चौकशीसाठी बोलावून घेतलं होतं. यासगळ्यात बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटही समोर आले होते. त्यात कित्येक प्रसिद्ध कलाकारांचा समावेश होता. यासगळ्यात बॉलीवूडची मोठ्या प्रमाणात नाचक्की झाली होती. त्यात बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारनं चाहत्यांना शांत राहण्याचे आणि कलाकारांना समजून घेण्याचे आवाहन केले होते.

सोशल मीडियावर सुशांत सिंगचा चाहतावर्ग मोठा आहे. सुशांत हा विषय नेहमी ट्रेडिंग असल्याचे दिसून आले आहे. त्याचे चाहते सुशांतला न्याय कधी मिळणार असा प्रश्नही विचारत असतात. यासगळ्यात सुशांतच्या आत्महत्येपूर्वी त्याची मॅनेजर दिशा सालियननं देखील आत्महत्या केली होती. त्यामुळे या प्रकरणानं वेगळे वळण घेतले होते. यासगळ्यात तीन वर्षानंतर याप्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. एका मुलाखतीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले की, सुशांत आणि दिशाच्या मृत्यूप्रकरणावर सीबीआयकडून पुरावे गोळा करण्याचे काम वेगानं सुरु आहे. सगळे पुरावे जमा झाले की मग आम्ही हे प्रकरण उजेडात आणणार आहोत. जेव्हा लोकांनी देखील आमच्याकडे सगळे पुरावे आहेत आणि तुम्ही कारवाई करा असे म्हटले होते तेव्हा आम्ही ते पुरावे गोळा करुन त्याची तपासणी सुरु केली आहे. जर त्या पुराव्यात तथ्य असेल तर त्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

आम्ही काही रेकॉर्डिंग देखील केले आहे. त्यासाठी काही पुरावे गोळा केले आहेत. त्यामुळे आता कोणत्या गोष्टीवर तातडीनं बोलणे चूकीचे ठरेल. गेल्या तीन वर्षांपासून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. पोलीस आणि सीबीआय यांच्याकडे कोणताही ठोस पुरावा अजूनही कसा आला नाही असा प्रश्न सुशांतच्या चाहत्यांनी उपस्थित केला आहे.

Sushant singh rajput maharashtra deputy cm devendra fadnavis
Adipurush Controversy : 'लोकांनी फक्त हॉल बंद केले आहेत, ते उद्या काहीही करतील'! कोर्टानं पुन्हा झापलं

सुशांतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची देखील चौकशी करण्यात आली होती. तिनं सुशांतला ड्रग्ज दिले असा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. त्यानंतर तिला काही दिवस पोलीस कोठडीमध्येही ठेवण्यात आले होते. याशिवाय बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींची देखील चौकशी करण्यातआली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com