सुशांत बाबतीत फॉरेन्सिक एक्सपर्टचा नवीन खुलासा, पंखा जास्त न वाकण्यामागे काय आहे कारण?

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Saturday, 8 August 2020

सुशांतच्या डायरीतील काही पानं फाडली गेली आहेत. याशिवाय ज्या पंख्याला लटकून सुशांतने आत्महत्या केली असं म्हटलं जातंय तो पंखा जास्त वाकला नसल्याचं समोर येत आहे.

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाशी संबंधित एक महत्वाची माहिती शुक्रवारी समोर आली आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी एक स्टिंग ऑपरेशन केलं आहे. ज्यामध्ये अशी माहिती समोर आली आहे की सुशांतच्या डायरीतील काही पानं फाडली गेली आहेत. याशिवाय ज्या पंख्याला लटकून सुशांतने आत्महत्या केली असं म्हटलं जातंय तो पंखा जास्त वाकला नसल्याचं समोर येत आहे. या गोष्टी फॉरेन्सिक एक्सपर्टने सांगितल्या आहेत.

हे ही वाचा: अभिनेता संकर्षण क-हाडे 'या' रिऍलिटी शोमधून लवकरंच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा व्हिडिओ

या वृत्तवाहिनीने सोशल मिडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये फॉरेन्सिक एक्सपर्टला विचारलं जातंय की या पूर्ण प्रकरणाच्या तपासणीमध्ये त्यांना काही संशयास्पद गोष्टी मिळाल्या का? यावर उत्तर देताना एक्सपर्टने म्हटलंय की त्याच्या डायरीमधील काही पानं फाडली गेली आहेत. पहिल्या पानावर आजाराचं नाव लिहिलं आहे. मात्र त्यापुढची तीन-चार पानं गायब आहेत. माहित नाही की त्यात काय होतं आणि ते कोणी फाडले असतील? आत्ता याबद्दल काही सांगितल जाऊ शकत नाही. मात्र ही गोष्ट फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये लिहिली गेली आहे.

याव्यतिरिक्त त्यांना रक्ताचे डागही दिसले नाहीत आणि पंखा जास्त वाकलेला देखील दिसला नाही ज्याचा आधार घेऊन सुशांतने आत्महत्या केली असं म्हटलं जातंय.ही फाटलेली डायरी सीबीआयच्या हाती लागली असून याविषयीची अधिक माहिती मिळवण्यासाठी त्यांनी सिद्धार्थ पिठानीची चौकशी केली आहे.

त्याने सांगितलं की सुशांत स्वतःच त्याच्या डायरीची पानं फाडायचा. त्याला जेव्हा डायरीमधील एखागी गोष्ट नाही आवडली की तो लगेच फाडून टाकायचा. मात्र अजुनपर्यंत पंखा जास्त वाकला नसल्याची कोणतीही तपासणी झालेली नाही.     

sushant singh rajput forensic expert reveals the ceiling fan did not bend much  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput forensic expert reveals the ceiling fan did not bend much