चित्रपटात काम मिळेना म्हणून सुशांतने तयार ठेवला होता 'प्लॅन-बी' काय होता तो..

बरेच दिवस काम मिळेना म्हणून सुशांतने कँटिन सुरू करायचं ठरवलं पण त्यातही एक गंमत होती.
Sushant had made 'Plan-B' as he could not find work in the film
Sushant had made 'Plan-B' as he could not find work in the filmsakal

sushant singh rajput : 'पवित्र रिश्ता' ते बॉलीवुड असा सुशांत सिंह राजपूतचा प्रवास थक्क करणारा होता. इतकं नाव कमावणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं. त्याने या क्षेत्रात नाव मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली. सुशांतने अक्षरशः प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. पण काळाने त्याच्यावर घाला घातला. आजच्या दिवशी म्हणजे १४ जून २०२० रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. आजही त्यांच्या स्मृती आपल्या मनात जीवंत आहे. एक वेळ अशी आली होती की सुशांतला चित्रपटात कुणीही काम देत नव्हतं. म्हणून सुशांत 'प्लॅन बी' तयार केला होता. हा प्लॅन ऐकून धक्काच बसेल.. (Sushant had made 'Plan-B' as he could not find work in the film) (sushant singh rajput death anniversary)

Sushant had made 'Plan-B' as he could not find work in the film
सुशांतने पिके चित्रपटासाठी घेतलं होतं फक्त २१ रुपये मानधन, कारण..

सुशांत लहानपणापासूनच आभ्यासात फार हुशार होता. पण अभिनयाच वेड लागल्याने त्याने इंजिनियरिंगच शिक्षण सोडून अभिनयकडे वाट वळवली. सुरवातीला त्याने डान्स मध्ये आपलं करियर केलं आणि मग एक थियटर ग्रुप जॉइन करून अभिनयाची सुरवात केली. मालिका आणि चित्रपटात काम मिळव यासाठी सुशांत अहोरात्र मेहनत घेत होता. पण बराच वेळ त्याला काम मिळत नव्हतं. पुढे त्याला बरंच काम मिळालं पण ते जर मिळालं नसतं तर सुशांतने एक भन्नाट प्लॅन बी तयार केला होता. याबाबत त्याने स्वतः एक मुलाखतीत सांगितले होते.

'मी एक प्लॅन तयार केला होता. मी मुंबईतील फिल्मसिटीमध्ये कॅन्टीन सुरू करण्याचा विचार करत होतो. त्याच फिल्मसिटी मध्ये राहून मग स्वतःच्या फिल्म, डॉक्युमेंट्री तयार करून त्यात मीच अभिनय करणार असे ठरवले होते. कारण जास्तीत जास्त वेळ मला फिल्मसिटीमध्ये राहता येईल. याच ठिकाणी राहून मला हवे ते करता येईल या विचाराने मी हा प्लॅन तयार केला होता,' असे सुशांतने सांगितले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com