'सुशांतची हत्या झाली आहे, मुंबई पोलीस कोणाला तरी वाचवण्याचा करतायेत प्रयत्न' - नारायण राणे

narayan rane on sushant
narayan rane on sushant

मुंबई- सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या हे प्रकरण आता एकप्रकारे खेळ बनत चालला आहे. या प्रकरणामुळे दोन राज्यांतील पोलीसांचे आपापसांत मतभेद होऊन आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरु झाला. मात्र हे प्रकरण इथेच थांबत नाहीये. आता तर भाजपचे नेते नारायण राणे यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांनी दावा केला आहे की सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे.

याप्रकरणी जेव्हा सुशांतच्या वडिलांनी पटना पोलिसांकडे रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दाखल केली तेव्हाच मुंबआ पोलिसांकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टीकोन बदलला. जवळपास ४० दिवसांच्या तपासामध्ये मुंबई पोलिसांनी या प्रकरणात कोणताच खुलासा केला नव्हता. जेव्हापासून बिहार पोलिसांनी यात लक्ष घालण्यास सुरुवात केली तेव्हा प्रकरण हळूहळू समोर येऊ लागलं आहे.

यावरुनंच भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले आहेत.नारायण राणे यांनी असा दावा केला आहे की  सुशांतने आत्महत्या केली नव्हती. उलट त्याची हत्या झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत राणे यांनी सांगितलं की 'सुशांत राजपूतने आत्महत्या केली नव्हती. त्याची हत्या झाली आहे. महाराष्ट्र सरकार काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार या प्रकरणात लक्ष घालत नाहीयेत.'

या प्रकरणात मुंबई पोलिसांचं वागणं हे संशयास्पद असल्याचं म्हटलं जातंय. सगळ्यात आधी मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांना या तपासात मदत केली नाही. त्यानंतर तपास कुठपर्यंत आला हे पाहण्यासाठी आलेल्या पटनाचे एसीपी विनय तिवारी यांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आलं. याशिवाय सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सालीयनची केस फाईल डिलीट केली. या सगळ्यामुळे मुंबई पोलिसांवरील संशय वाढत चालला आहे.

आता तर सुशांतच्या वडिलांनी देखील सीबीआय तपासाची मागणी केली आहे. ज्यामुळे बिहार सरकारद्वारे देखील सीबीआय तपासाची शिफारस करण्यात आली आहे. याबाबतची माहिती बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी स्वतः त्यांच्या ट्विटरवरुन दिली आहे.     

sushant was murdered and mumbai police is hiding something says bjp leader narayan rane  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com