सुशांतने मृत्युच्या ५ दिवस आधी बहीण मितूला केला होता SOS कॉल, म्हणाला 'ते लोक मला मारुन टाकतील'

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Tuesday, 22 September 2020

८ जून पासून ते १४ जून पर्यंत काय काय झालं याचे आत्तापर्यंत अनेक खुलासे समोर आले आहेत. मात्र आता रियाने सुशांतचं घर सोडल्यानंतर त्याने बहीण मितू सिंहला एसओएस कॉल केल्याचं समोर आलं आहे.

मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युला तीन महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. मात्र या प्रकरणात आत्तापर्यंत कोणताच खुलासा होऊ शकलेला नाही. सुशांतचा मृत्यु आत्महत्या केल्याने झाला की त्याचा खून करण्यात आला कि याही पुढे जाऊन त्याला आत्महत्येसाठी उकसवण्यात आलं या सगळ्या कारणांचा तपास सीबीआय करत आहे. ८ जून पासून ते १४ जून पर्यंत काय काय झालं याचे आत्तापर्यंत अनेक खुलासे समोर आले आहेत. मात्र आता रियाने सुशांतचं घर सोडल्यानंतर त्याने बहीण मितू सिंहला एसओएस कॉल केल्याचं समोर आलं आहे.

हे ही वाचा:  अभिनेता कार्तिक आर्यनने साईन केले ३ सिनेमे, झाली एवढ्या कोटींची डिल  

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणात आता एक नवीन खुलासा झाला आहे. सुशांत सिंह राजपूतने त्याच्या मृत्युच्या ५ दिवस आधी त्याची मोठी बहीण मितू सिंहला एसओएस कॉल केला होता. ज्यामध्ये त्याने म्हटलं होतं की 'मला भिती वाटतेय की हे लोक मला मारुन टाकतील.' एका मिडिया रिपोर्टनुसार, सुशांत सिंह राजपूतने बहीण मितूला कॉल करुन सगळ्यात आधी सांगितलं की त्याने रियाला खूप वेळा कॉल केला पण तिने त्याच्या कॉल उचलला नाही. त्याने म्हटलं होतं की 'मला तिच्याशी बोलणं अत्यंत गरजेचं आहे कारण मला भिती वाटतेय की ते लोक मला याच गोष्टीत अडकवतील.'

याआधी देखील सिद्धार्थ पिठानीने सीबीआयच्या तपासात सांगितलं होतं की सुशांत दिशाच्या मृत्युची बातमी ऐकून बेशुद्ध पडला होता. तो जेव्हा शुद्धीत आला तेव्हा तो म्हणाला होता की ते लोक मला मारुन टाकतील. नंतर त्याने त्याची सुरक्षा वाढवण्यासाठी देखील सांगितलं असल्याचं पिठानीने म्हटलंय. एवढचं नाही तर रियाला तो सतत फोन लावत होता कारण ती त्याचा लॅपटॉप, हार्ड ड्राईव्ह आणि कॅमेरा घेऊन निघून गेली होती. आणि सगळ्यांचे पासवर्ड तिला माहित होते.   

sushant singh rajput sos message to sister mitu singh on 9 june says mujhe maar denge as per reports  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushants sos call to sister mitu singh on 9 june says mujhe maar denge as per reports