esakal | 'तुझी खरी आई कोण?'; नेटकऱ्यांच्या ​प्रश्नावर सुष्मिताच्या मुलीचे उत्तर
sakal

बोलून बातमी शोधा

sushmita sen,renee sen

'तुझी खरी आई कोण?'; नेटकऱ्यांच्या ​प्रश्नावर सुष्मिताच्या मुलीचे उत्तर

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

अभिनेत्री सुष्मिता सेनची (sushmita sen) मुलगी रिनी सेनला (renee sen) अनेक वेळा 'तुझी खरी आई कोण?' असा प्रश्न विचारला जातो. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये रिनीने हा प्रश्न विचारणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. रिनी म्हणाली, 'मला सोशल मीडियावर अनेक वेळा असा प्रश्न विचारला जातो की तुझी खरी आई कोण आहे? मला त्या प्रश्न विचारणाऱ्या लोकांना हे विचारायचे आहे की, खरी आई म्हणजे काय? आणि 'खऱ्या आई' ची नेमकी व्याख्या काय आहे? '(sushmita sen daughter renee sen give answer to question Who your real mother)

रिनी पुढे म्हणाली, 'मला माहित आहे की लोक आमच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. परंतु मला असे वाटते की लोकांनी एकमेकांसोबत चांगले राहिले पाहिजे. मी अगदी स्पष्ट आणि उघडपणे सर्व काही शेअर करत असते. पण लोक मला सतत असे प्रश्न विचारत असतात. लोकांनी थोड संवेदनशील राहिलं पाहिजे. मला लोकांच्या प्रश्नाबद्दल काही वाटतं नाही. कारण मला हे ऐकण्याची सवय आहे. पण एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही असा प्रश्न विचारला तर त्यांना त्रास होऊ शकतो. मला वाटते की असले प्रश्न तोपर्यंत विचारू नयेत जोपर्यंत लोक स्वत;ताहून सांगत नाहीत.' इन्टाग्रामवरील 'आस्क मी एनिथिंग'(Ask Me Anything) या सेशनमध्ये रिनीला एका नेटकऱ्यानी 'तुझी खरी आई कोण?' असा प्रश्न विचारला होता. त्यावर रिनीने उत्तर दिले होते, 'माझी आई माझ्या हृद्यात आहे. जे आहे ते मी तुम्हाला सांगते आहे.'

हेही वाचा: 'वडिलांच्या वयाचे आहेत ते..'; व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी केले कियाराला ट्रोल

सुष्मिताने रिनीला 2000 साली दत्तक घेतले. त्यानंतर 2010मध्ये सुष्मिताने अलिशाला दत्तक घेतले. रिनीने ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'सुट्टाबाज' या शॉर्ट फिल्ममधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सुष्मिताने अभिनय क्षेत्रामधून काही दिवस ब्रेक घेतला होता. 2020 मध्ये आर्या या वेब सीरिजमधून तिने कमबॅक केलं. सुष्मिता सध्या रोहमन शाल या मॉडेलला डेट करत आहे.

हेही वाचा: भावी सुनेनं उचललं 80 किलो वजन: सासुनं दिली कमेंट, व्हिडिओ व्हायरल

loading image