esakal | १५ वर्षांच्या मुलाने सुष्मिताला चुकीच्या पद्धतीने केला होता स्पर्श
sakal

बोलून बातमी शोधा

Sushmita Sen

"घोळक्याचा फायदा घेत १५ वर्षांच्या मुलाने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला."

१५ वर्षांच्या मुलाने सुष्मिताला चुकीच्या पद्धतीने केला होता स्पर्श

sakal_logo
By
स्वाती वेमूल

२०१८ मध्ये जगभरातील मनोरंजन सृष्टीतील अभिनेत्रींनी 'मी टू' (#MeToo) मोहिमेअंतर्गत त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार आणि गैरवर्तणुकीविरोधात आवाज उठवला. या मोहिमेअंतर्गत अनेक मोठमोठ्या अभिनेत्रींनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. अभिनेत्री सुष्मिता सेननेही तिच्यासोबत घडलेला प्रसंग एका मुलाखतीत सांगितला. २०१८ मध्ये मुंबईतील एका कार्यक्रमात सुष्मिताला महिलांच्या सुरक्षेवरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी एका १५ वर्षांच्या मुलाने तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा खुलासा तिने केला होता. 

सुष्मिता म्हणाली, "जवळपास सहा महिन्यांपूर्वी घडलेली ही घटना आहे. एका पुरस्कार सोहळ्यात माझ्या आजूबाजूला पत्रकारांचा घोळका होता. त्या घोळक्याचा फायदा घेत एका १५ वर्षांच्या मुलाने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. त्या गर्दीत मी त्याचा हात पकडून त्याला समोर खेचलं तेव्हा तो अल्पवयीन असल्याचं पाहून मला धक्काच बसला. मी त्यावेळी त्याच्याविरोधात कारवाई करू शकले असते. पण मी तसं केलं नाही. त्याच्याशी बोलण्यासाठी मी त्याला बाजूला घेऊन गेले. जर या घटनेविषयी मी कुठे वाच्यता केली तर तुझं आयुष्यच संपेल असा इशारा मी त्याला दिला. सुरुवातीला त्याने काही केलंच नाही असा आव आणला. पण नंतर त्याने माझी माफी मागितली आणि भविष्यात असं कधीच कोणासोबत करणार नसल्याचं सांगितलं."

हेही वाचा : "अजय-काजोलने सर्वांपासून लपवलं"; महिमा चौधरीने सांगितल्या भीषण अपघाताच्या आठवणी 

"सेलिब्रिटींसोबत बॉडीगार्ड असल्याने त्यांना अशा घटनांना सामोरं जावं लागत नाही असं सामान्य लोकांना वाटतं. पण आम्हालासुद्धा तशा गोष्टींचा सामना करावा लागतो. मुलींनी स्वत:च्या सुरक्षेसाठी काही गोष्टींचं प्रशिक्षण घ्यायला हवं," असंही ती म्हणाली. 
 

loading image