हृतिकसमोरच पुर्वाश्रमीची पत्नी सुझैननं बॉयफ्रेंडसोबत ओलांडली मर्यादा...

हृतिक रोशन आणि त्याची पू्र्वाश्रमीची पत्नी सुझैन खान गेल्या काही दिवसांत आपल्या नवीन प्रेम प्रकरणांमुळे चर्चेत आहेत.
sussanne khan & Hrithik Roshan
sussanne khan & Hrithik RoshanGoogle

बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशन(Hrithik Roshan) आणि त्याची पू्र्वाश्रमीची पत्नी सुझैन खान(Sussanne Khan) गेल्या काही दिवसांत आपल्या नवीन प्रेम प्रकरणांमुळे चर्चेत आहेत. जिथे एकीकडे हृतिक रोशन सबा आझाद(Saba Azad) सोबतच्या आपल्या नात्यामुळे दर एकदिवसाआड बातमीपत्राच्या हेडलाईनमध्ये झळकतोय तर दुसरीकडे त्याची पुर्वाश्रमीची पत्नी सुझैन खान आपला कथित बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. नुकतंच मुंबई विमानतळावर ५ एप्रिल रोजी या दोन्ही कपल्सना वेगवेगळ्या वेळेत म्हणजे अगदी तासाभराच्या फरकाने एकमेकांचा हात हातात घेऊन चालताना पाहिलं गेलं. तिथेच आता एक व्हिडीओ समोर आलाय ज्यात हे चारही जण पार्टीत धमाल करताना दिसत आहेत. या व्हिडीओत हे दोन्ही कपल आपल्या एक्स समोर आपापल्या पार्टनर सोबत एकदम जवळीक साधताना दिसत आहेत. तो व्हिडीओ आम्ही इथे बातमीत जोडलेला आहे.

sussanne khan & Hrithik Roshan
गर्मीने घसा सुकला सांगत चाहत्याची सोनूकडे बिअरची डिमांड;सूदभाईचं कडक उत्तर

हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझैन खान हिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये हृतिक,सबा,अर्सलान आणि स्वतः सुझैन खान पार्टीतमध्ये एन्जॉय करताना दिसत आहेत. ही पार्टी खरंतर सुझैननेच आयोजित केली होती. तिनं या पार्टीत काढलेल्या ढिगभर फोटोंचा एक कोलाज करत त्याचा एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

या व्हिडीओत पहिल्यांदाच हृतिक रोशन आणि सुझैन खानला आपापल्या नवीन पार्टनरसोबत एका फ्रेममध्ये पाहिलं जोऊ शकतं. यात हृतिक आणि सुझैन एकमेकांसमोर आपापल्या पार्टनरसोबत खूप जवळीक साधताना दिसत आहेत. हे चारही जण खूप खूश दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वीच सुझैन आणि अर्सलानचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. या व्हिडीओत सुझैन खान मित्रांसोबत पार्टी करताना दिसली. त्यानंतर सगळ्यांना निरोप देताना दिसली. पण त्यात फक्त अर्सलान गोनीला तिनं घट्ट मिठी मारत गुडबाय केलं. तेव्हा ज्या प्रकारे ते दोघे एकमेकांना भेटले तेव्हाच कळलं की यांच्यात नातं फुलतंय. दोघांनी एकदाच नाही तर सारखं एकमेकांच्या गळ्यात गळे घालून मिठी मारली आणि किसही केलं आणि मग गुडबाय केलं. जेव्हा सुझैन गाडीत बसून निघून जात होती तेव्हा देखील ती वळून वळून अर्सलानकडे पाहत होती. यावरनंच अंदाज आला की सुझैन खानला नवा जोडीदार मिळाला. पण हृतिकसमोर सुझैननं गोव्याच्या पार्टीत अर्सलानशी जवळीक साधल्यानं उगाचच वेगळ्या चर्चेचा सुर निघत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com