
Swara Bhaskar On Kangana: 'आता तू पण....', स्वरानं कंगनाला दिला मोलाचा सल्ला
अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या तिच्या लग्नामुळं चर्चेत आहे. तिने सपा नेते फहद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केले आणि सर्वांना आनंदाचा धक्काच दिला. त्यानंतर तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव झाला. त्यातच बॉलिवुडची क्विन कंगना राणौतही होती. खरं तर कंगणा आणि स्वरा याच्यातील शाब्दिक युद्ध तर आपल्या सर्वांनाच माहित आहे. मात्र तिने स्वरा भास्करला तिच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या.
फहद आणि स्वरा यांचे अभिनंदन करताना कंगना म्हणाली होती की, लग्न मनापासून होतात, बाकी सर्व काही फक्त औपचारिकता असते. कंगनाच्या अभिनंदनावर आता स्वरा भास्करची प्रतिक्रिया समोर आली आहे. स्वराने कंगनाचे आभार मानले आहेत. आता स्वराच्या ट्विटची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे.
लग्न झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत स्वरा भास्करने ट्विटरवर काही फोटो शेअर केले होते. या पोस्टवर कंगनाने स्वरा आणि फहदला प्रत्युत्तर देत लिहिले, ट्वीटमध्ये कंगना म्हणते,"देवाच्या कृपेने तुम्ही दोघे एकत्र खूप खूष दिसत आहात. लग्नं ही मनांची जुळतात, बाकी सगळी औपचारिकता असते."
यावर स्वरा भास्करने आता आभार मानत लिहिले आहे, "धन्यवाद कंगना... तुला प्रत्येक सुख आणि आनंद मिळो." कंगना रनौत आणि स्वरा भास्कर या दोघी स्पष्टवक्ते वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात. नेहमीच दोन्ही स्टार्सच्या विचारांमध्ये बराच फरक दिसून आला आहे. मात्र, कंगनाने लग्नासाठी तिचे केलेले अभिनंदन आणि त्यानंतर स्वराने दिलेल्या उत्तरावरून दोघांचे नाते सुधारल्याचं दिसतयं.