
पिंक, बेबी, नाम शबाना, बदला, सांड की आँख, मुल्क अशा उत्तम कथानक असलेल्या चित्रपटांमध्ये तापसीने अभिनयाची झलक दाखवली आहे. इन्स्टाग्रामवरून तिने आता तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.
अलीकडच्या काळात हुशार अभिनेत्री तापसी पन्नूने चांगीलच पकड घेतली असून, चांगल्या विषयांवील चित्रपट करण्याकडे तिचा ओढा वाढला आहे. पिंक, बेबी, नाम शबाना, बदला, सांड की आँख, मुल्क अशा उत्तम कथानक असलेल्या चित्रपटांमध्ये तिने अभिनयाची झलक दाखवली आहे. इन्स्टाग्रामवरून तिने आता तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.
कबीर बेदींनी सनी लियोनीकडं मागितला फोन नंबर, पुढं झालं असं!
तापसी लवकरच "लूट लपेटा' या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट "रन लोला रन' या जर्मन चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. याची माहिती तापसीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून दिली. चित्रपटात तापसीसोबत अभिनेता ताहिर राज भसीनदेखील झळकणार आहे. हा चित्रपट थ्रिलर कॉमेडी असून तापसी एका हटके भूमिकेत दिसणे अपेक्षित आहे.
एप्रिल महिन्यापासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून, पुढील वर्षी 29 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आकाश भाटिया करणार आहेत. तर निर्मिती सोनी पिक्चर्स करत आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
सध्या तापसी तिच्या 'थप्पड' या चित्रपटाचे प्रमोशन असून तिची भूमिका स्त्रीकेंद्रीत आहे. 28 फेब्रुवारीला थप्पड रिलीज होईल.