'जेठालाल'शी वादाबाबत 'तारक मेहता' म्हणाले, "छे आम्ही कधी.."

shailesh lodha and dilip joshi
shailesh lodha and dilip joshi

छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या सर्वांत लोकप्रिय मालिकेतील कलाकार दिलीप जोशी आणि शैलेश लोढा हे गेल्या तेरा वर्षांपासून एकत्र काम करत आहेत. पडद्यावर जेठालाल आणि तारक मेहता अशा भूमिका साकारणाऱ्या या दोघांमध्ये आजवर कधीच भांडणाची ठिणगी उडाली नव्हती. मात्र एका वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, दिलीप जोशी आणि शैलेश लोढा काही मतभेदांमुळे सेटवर एकमेकांशी बोलत नसल्याची जोरदार चर्चा होऊ लागली. एकमेकांचे खास मित्र असणाऱ्या या दोघांमध्ये नेमकं काय बिनसलं, असा प्रश्न चाहत्यांनाही पडला. आता या संपूर्ण प्रकरणात शैलेश लोढा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'दैनिक भास्कर'ला दिलेल्या मुलाखतीत शैलेश यांनी दिलीप यांच्यासोबत कोणतेच मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं. इतकंच नव्हे तर ऑनस्क्रीनपेक्षा ऑफस्क्रीन आमची मैत्री आणखी घनिष्ठ असल्याचं त्यांनी सांगितलं. 

"शूटिंगनंतर आम्ही एकमेकांसोबत बराच वेळ गप्पा मारत असतो. विविध विषयांवर आमच्या गप्पा रंगतात आणि यामुळेच आम्हाला सेटवर बेस्ट बडी असं नाव दिलंय. दिलीप माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत आणि त्यांचा मी खूप आदर करतो. आम्ही दोघंही आमच्या कामात इतके पारंगत झालो आहोत की कधी कधी आम्हाला स्क्रीप्टचीही गरज भासत नाही. आमची मैत्री पडद्यावरही सहज झळकते. काम झाल्यानंतर आम्ही सेटवर मजामस्तीसुद्धा करतो. आम्ही दोघांनी एकमेकांसोबत इतकी वर्षे काम केलं आहे, तरी आजवर कधीच मतभेद निर्माण झाले नाहीत. मी देवाकडे प्रार्थना करतो की भविष्यातही आमची मैत्री अशीच राहू दे. आमच्या भांडणाच्या अफवा कोण पसरवतं काय माहित", असं तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश म्हणाले. 

दिलीप आणि शैलेश वेगवेगळ्या व्हॅनिटी वॅनमध्ये बसत असल्याचीही चर्चा होती. त्यावरही शैलेश यांनी उत्तर दिलं. मेकअपसाठी आम्ही दोघं एकच व्हॅनिटी वॅन वापरत असल्याचं त्यांनी सांगितलं. या संपूर्ण प्रकरणावर जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांनी अद्याप कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. 
मनोरंजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com