
तारक मेहता मालिकेतील कोमल भाभीवर नेटक-यांनी सडकून टीका केली आहे. त्या टीकेला न घाबरता कोमल भाभीने जशास तसे उत्तर दिले आहे. त्या मालिकेत अंबिका रंजनकर ही कोमल भाभी यांची भूमिका करत आहे.
मुंबई - चाहते आपल्या आवडत्या कलाकारांना जेवढ्या प्रेमानं डोक्यावर घेतात तेवढ्याच रागानं ते त्यांच्यावर टीका करायला मागेपुढेही पाहत नाही. सध्या आपला टीआरपी टिकविण्यासाठी अनेक कलाकार सोशल मीडियाचा आधार घेत असल्याचे दिसून आले आहे. असाच एक प्रकार तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील एका महिला कलाकाराच्या बाबत घडला आहे.
किती मुर्ख आहे मी,हो की नाही? कंगनानं उर्मिला मातोंडकर यांना सुनावलं
तारक मेहता मालिकेतील कोमल भाभीवर नेटक-यांनी सडकून टीका केली आहे. त्या टीकेला न घाबरता कोमल भाभीने जशास तसे उत्तर दिले आहे. त्या मालिकेत अंबिका रंजनकर ही कोमल भाभी यांची भूमिका करत आहे. काही ट्रोलर्सनं त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांनी सडेतोड उत्तर देऊन टीका करणा-यांची तोंडं बंद केली आहेत. टेलिव्हिजनवर सर्वाधिक लोकप्रिय मालिका म्हणूनही तारक मेहता का उल्टा चष्माचे नाव आहे. त्यातील पात्रे प्रचंड लोकप्रिय आहेत. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेतील एक प्रमुख कलाकार अंबिका रंजनकर यांना टीका सहन करावी लागत आहे.
'टोमणे मारल्याशिवाय जमत नव्हते, दोन वेळच्या जेवणाची होती चिंता'
कलाकारांच्या वाट्याला जशी स्तुती येते तशी टीकाही येते. यापैकी काही कलाकार त्या टीकेचा सकारात्मक विचार करतात. तर काही ज्यांनी आपल्यावर टीका केली आहे त्यांना जशास तसे उत्तर देतात. अंबिका रंजनकार यांचे त्यासाठी नाव घ्यावे लागेल. सोशल मीडियावर रिकाम टेकड्यांची संख्या मोठी आहे. त्यातील काही रिकामटेकडे कुठल्याही सेलिब्रेटींवर टीका करत असतात. त्यासाठी त्यांना कोणतेही कारण चालते. याप्रकरणी तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील कोमल भाभीनं टीका करणा-यांचे दात घशात घातले आहे.
एका युझर्सनं अंबिकाच्या फोटोवर वाह्यात कमेंट केली आहे. त्यात त्यानं म्हटलं आहे की, , 'जा डूब के मरजा रे चुल्लू भर पानी में।' यावर अंबिकानं खमक्या भाषेत उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, मी आपल्याला नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. नववर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही ज्यापध्दतीनं स्वागत केलं आहे ते पाहून आनंद वाटला. मी कल्पना करु शकते की तुम्ही किती दुखात आहात ते, अपेक्षा करते की, मी केलेली पोस्ट तुमचे मित्र पाहु शकणार नाही अशी. अंबिकाच्या पोस्टला इतर कलाकारांनी सपोर्ट केला आहे.
'मिशन मजनू' आहे तरी काय; सिद्धार्थ आणि रश्मिकाचा नवा चित्रपट