esakal | 'मिशन मजनू' आहे तरी काय; सिद्धार्थ आणि रश्मिकाचा नवा चित्रपट
sakal

बोलून बातमी शोधा

Rashmika_Siddharth

सिद्धार्थ मल्होत्रा आणि मंदाना यांच्या नव्या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. भारतीय गुप्तहेरांनी पाकिस्तानची अनुचाचणी कशाप्रकारे रोखली याची गोष्ट चित्रपटाच्या माध्यमातून उलगडण्यात आली आहे.

'मिशन मजनू' आहे तरी काय; सिद्धार्थ आणि रश्मिकाचा नवा चित्रपट

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : पाकिस्तानचे अणू परीक्षण उधळून लावण्यावर आधारित असलेला मिशन मजनू हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. बऱ्याच दिवसांपासून सिद्धार्थचा कुठलाही चित्रपट आलेला नव्हता. एका वेगळ्या विषयांवर आधारित असलेला हा चित्रपट अनोखी पर्वणी ठरणार आहे. मे महिन्यात चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असल्याची चर्चा आहे. 

सिद्धार्थ मल्होत्रा आणि मंदाना यांच्या नव्या चित्रपटाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. भारतीय गुप्तहेरांनी पाकिस्तानची अनुचाचणी कशाप्रकारे रोखली याची गोष्ट चित्रपटाच्या माध्यमातून उलगडण्यात आली आहे. विशेष म्हणजे सिद्धार्थ हा चित्रपटात गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. मंदानाची भूमीकाही त्याच प्रकारची आहे. राजी आणि गाजी अटॅक हे चित्रपटही पाकिस्तानच्या कुरापतीवर आधारित होते. एका आठवड्यापूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. सध्या त्यासाठी लोकेशन हंटिंग सुरू असून त्याकरिता टीम चंदीगड, पंजाब, भोपाळ मध्ये शोध घेत आहे. 

शाहरुख खानचा नवीन वर्षातील पहिला व्हिडिओ, दिली आगामी सिनेमाची हिंट​

गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ आणि कियारा अडवाणी यांच्याविषयी चर्चा सुरू आहे. तिच्यासोबत नवे वर्ष साजरे करण्यासाठी तो मालदीवला गेला आहे. त्यांनी सोशल मीडियावर अद्याप कुठलेही फोटो शेयर केले नसून मागील वर्षी देखील ते नव्या वर्षाच्या निमित्ताने आफ्रिकेला गेले होते. या चित्रपटासाठी पाकिस्तान सारखे दिसणारे शहर दिसावे म्हणून वेगाने शोधाशोध सुरू आहे. 

अक्षय कुमार फोन चार्ज करण्यासाठी शोधत होता चार्जर पॉईंट, मग पाहा काय झालं...​

सिद्धार्थ मे पासून चित्रीकरनाला सुरुवात करणार आहे. त्याने थडम नावाच्या एका दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेकही साइन केला आहे. त्यात तो डबल रोल मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या खलनायकासाठी कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्रा एका नवीन कलाकाराच्या शोधात आहे. पाकिस्तानच्या घातपाती कारवायाविषयी अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पाकिस्तानच्या अणूचाचणी बाबत एक मिशन पार पडले होते. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यांनी हे मिशन फत्ते करण्यासाठी कोवर्त मिशनला परवानगी दिली होती. अणू परीक्षणावर आधारित या अगोदर जॉन अब्राहमचा पोखरण हा सिनेमा आला होता. अटल बिहारी यांच्या अनु परीक्षणावर आधारित हा चित्रपट होता.

नेहा कक्करला करायचंय दुसऱ्यांदा लग्न; वाचा काय आहे कारण​

- मनोरंजन क्षेत्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image