'टोमणे मारल्याशिवाय जमत नव्हते, दोन वेळच्या जेवणाची होती चिंता'

'टोमणे मारल्याशिवाय जमत नव्हते, दोन वेळच्या जेवणाची होती चिंता'

मुंबई - टेलिव्हिजन अभिनेत्री रश्मी देसाई हिनं आपल्याला आलेले विदारक अनुभव सोशल मीडियावर व्यक्त केले आहेत. कोणे एकेकाळी आपण कुठल्या परिस्थितीतून जात होतो याविषयी ती बोलली आहे. आता जरी सुखाचे किंवा एका वेगळ्या ग्लॅमरच्या दुनियेत वावरत असली तरी इथपर्यंतचा प्रवास सोपा नसल्याचेही तिनं सांगितले आहे. 

दोन वेळच्या जेवणाची मला चिंता होती. कारण त्यावेळची परिस्थितीच तशी होती. सहजासहजी कुणी मदत करायला तयार होत नव्हते. मी तेव्हा नवीन होते. फारशी कुणाला ओळखत नव्हते. आणि तसेही आपल्या क्षेत्रात मदत करायची म्हटल्यास लोकं अनेक प्रकारची अपेक्षा ठेवताना दिसतात. मी डिप्रेशन मध्ये गेली याचे एक कारण या सर्व परिस्थितीशी देखील संबंधित आहे. अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या छळाचा सामनाही करावा लागला आहे. मला आता हे सगळे सांगावे लागत आहे याचे एक महत्वाचे कारण म्हणजे नव्याने या क्षेत्रात येणा-या कलाकारांना त्याची माहिती व्हावी. रश्मी देसाई ही बिग बॉसमध्येही दिसली होती. तिनं आपल्या पतीला घटस्फोट दिला. त्यानंतर तिच्या आईनं तिचा सांभाळ केला.

रश्मीनं आपल्याला किती वेदनादायी प्रसंगातून जावे लागले याविषयी सांगितले आहे, सहा - सात वर्षांचे असताना एका विचित्र अनुभवाला सामोरे जावे लागले होते, तो प्रसंग कुणालाही सांगता येण्यासारखा नाही. टेलिव्हिजनच्या पडद्यावर आपल्या अभिनयानं वेगळा ठसा उमटविणा-या रश्मीला आलेले अनुभव हेलावून टाकणारे आहेत. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत याबाबत तिनं सविस्तरपणे सांगितले आहे. दोन वेळच्या जेवणासाठी मोठा संघर्ष करावा लागला हे ती सांगते.

माझं कुटूंब हे एक मोठं कुटूंब होतं. सर्वजणांमध्ये त्याला प्रतिष्ठाही होती. पण ते इतरांसारखे श्रीमंत नव्हते. माझे पालनपोषण आईनं केलं. त्यावेळी घरात इतके पैसेही नव्हते. लहानपणाचे ते दिवस आठवले की फार वाईट वाटते. मला शाळेत असतानाही त्रास झाला होता. कुठलीही वस्तू घ्यायची झाल्यास पैसे नसल्यानं निराश व्हायचे. अशावेळी शिक्षण पूर्ण कसे करायचे असा प्रश्न माझ्यापुढे होता. काही झाले तरी शिक्षणाच्या बाबत तडजोड नको असे आईचे म्हणणे होते. अनेकदा सण साजरे करण्यासाठीही घरात पैसे शिल्लक नसायचे. अशी खंत रश्मीनं यावेळी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com