'शोले'मधील 'कालिया'सोबत 'बबिता'चा फोटो व्हायरल; काय आहे कारण? | Munmun Dutta | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Munmun Dutta

'शोले'मधील 'कालिया'सोबत 'बबिता'चा फोटो व्हायरल; काय आहे कारण?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

‘तारक मेहता का उल्टा चश्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या लोकप्रिय मालिकेत बबिताची Babita भूमिका साकारत अभिनेत्री मुनमुन दत्ता Munmun Dutta घराघरात पोहोचली. तिला या पात्राने प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली आहे. मुनमुन ही तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. तसेच ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. नुकतचं मुनमुनने तिचे फोटो पोस्ट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. काही दिवसांपूर्वींच मुनमुन तिच्या नव्या घरात राहायला गेली. त्यावेळी सामानाची आवराआवर करताना तिला स्वतःचे काही जुने फोटो सापडले. त्यातीलच एक फोटो मुनमुनने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.

सध्या तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ती 'शोले' चित्रपटातील कालियासोबत दिसत आहे. हा फोटो एका टीव्ही शोमधील आहे, ज्यात ती मराठी अभिनेते विजू खोटे म्हणचेज शोले चित्रपटातील प्रसिद्ध पात्र कालियासोबत दिसतेय. या फोटोसोबत तिने तिच्या अभिनयक्षेत्रातील कारकिर्दीत आलेल्या अनुभवांना उजाळा दिला आहे.

हेही वाचा: मुनमुन दत्ताचं नवीन घर पाहिलं?

फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, 'नवीन अपार्टमेंटमध्ये आवरा-आवर करत असताना या जुन्या आठवणी एका सुटकेसमध्ये बंद केलेल्या आढळल्या. मला आयुष्यात आलेल्या या सर्व अनुभवांसाठी मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे.' मुनमुनने २००४ मध्ये झी टिव्ही वरील 'हम सब बाराती' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

loading image
go to top