Padma Vibhushan Zakir Hussain: पद्मविभुषण झाकीर हुसेन कायमच राहिले बॉलीवूडपासून चार हात लांब.. कारण.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

zakir hussain, padma vibhushan zakir hussain,

Padma Vibhushan Zakir Hussain: पद्मविभुषण झाकीर हुसेन कायमच राहिले बॉलीवूडपासून चार हात लांब.. कारण..

Padma Vibhushan Zakir Hussain: केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर केले. यामध्ये महाराष्ट्रातील 12 जणांना विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये प्रसिद्ध तबलावादक झाकिर हुसेन यांना कला क्षेत्रातून पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

(Tabla Maestro Ustad padma vibhushan Zakir Hussain never work in bollywood this is the reason)

हेही वाचा: महाराष्ट्रातल्या 'या' हिऱ्यांना पद्म पुरस्कार जाहीर: Padma Awards

झाकीर हुसेन यांनी त्यांच्या तबलावादनाने गेली अनेक पिढ्या प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. झाकीर हुसेन सुप्रसिद्ध तबलावादक असूनही ते बॉलिवूड पासून मात्र चार हात लांबच राहीले. एका मुलाखतीत झाकीर हुसेन यांनी यामागचे कारण सांगितलं.. "लाईव्ह मैफिलीत लोकांसमोर परफॉर्म करणे हे माझे पहिले प्रेम आहे. जर मी सिनेमांसाठी संगीत देत असेल, तर मला एकाच ठिकाणी उभे राहणे आवश्यक आहे.

माझ्यासारख्या जगभर फिरणाऱ्या व्यक्तीसाठी एकाच ठिकाणी उभं राहणं अत्यंत कठीण आहे. मी बॉलिवूडला कधीच नाही म्हटले नाही. पण जर मला प्रॉडक्शन हाऊससोबत काम करण्याची संधी मिळाली आणि त्याचा माझ्या मैफिलीच्या वेळापत्रकावर परिणाम होत नसेल, तर मी जरूर काम करेल"

हेही वाचा: Pooja Sawant Birthday: 'ए कलरफुल' जिच्यावर तरुणाई फिदा अशी सावंतांची पुजा

अशाप्रकारे लाईव्ह मैफिलीत होणाऱ्या परफॉर्मन्सला झाकीर हुसेन प्राधान्य देतात. बॉलिवूड मध्ये स्टुडिओ मध्ये काम करणं एक कलाकार म्हणून झाकीर हुसेन यांना काहीस आवडत नाही. लाईव्ह मैफिलीत लोकांसमोर सादरीकरण करण्यात झाकीर हुसेन यांचं मन रमतं. त्यामुळे निर्माता - दिग्दर्शक जे सांगेल त्या आधारे संगीत निर्माण करण्यास झाकीर हुसेन याना तितकं पटत नाही.

झाकीर हुसेन यांना त्यांचे वडिल उस्ताद अल्ला राखा यांच्याकडून तबलावादनाचे धडे मिळाले. वयाच्या ७ व्या वर्षापासूनच झाकीर हुसेन मैफिलीत तबलावादन करू लागले. केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन झाकीर हुसेन यांच्या कार्याचा उचित सन्मान केला आहे.