'लाळेमुळे खुलतं सौंदर्य'; तमन्ना भाटियाने सांगितलं ब्युटी सिक्रेट

'हे ऐकायला किळसवाणं वाटत असलं तरी..'
Tamannaah bhatia
Tamannaah bhatia instagram

चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या अभिनेत्रींचं ब्युटी सिक्रेट जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. या अभिनेत्री कोणता डाएट फॉलो करतात, चेहऱ्याला काय लावतात, असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडतात. या प्रश्नांना अभिनेत्री तमन्ना भाटियाने Tamannaah Bhatia दिलेलं एक उत्तर सध्या चर्चेत आहे. लाळ किंवा विशेषकडून सकाळची लाळ morning saliva ही त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असते, असं तिने म्हटलंय. चेहऱ्याला तिने सर्वांत विचित्र कोणती गोष्ट लावली आहे, असा प्रश्न तिला मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर तमन्नाने लाळेचा संदर्भ सांगितला. त्याचसोबत जर मुलींना किंवा महिलांना त्वचेच्या समस्या वारंवार जाणवल्यास वैद्यकीय सल्ला घेण्याचं आवाहन तिने केलं आहे. (Tamannaah bhatia says morning saliva actually works on skin)

'पिंकविला' या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तमन्ना म्हणाली, 'चेहऱ्यावर मी लावलेली सर्वांत विचित्र गोष्ट ही तेवढी विचित्र नाही. अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये एक मातीचा प्रकार मिसळून मी चेहऱ्याला लावला होता. माझ्या चेहऱ्यावर ती गोष्ट लावण्यासाठी मी कसं मान्य केलं हे आता मलाही आठवत नाही. पण ती विचित्र गोष्ट होती.'

Tamannaah bhatia
'कबीर सिंग' फेम वनिता खरातची इच्छापूर्ती; घेतली आलिशान गाडी

'तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर द्यायचं झालं तर मी म्हणेन स्वत:ची लाळ. विशेषकरून सकाळची लाळ ही त्वचेच्या समस्यांसाठी फायदेशीर आहे. हे ऐकायला जरी किळसवाणं वाटत असलं तरी त्याचा फायदा नक्की होतो', असं ती पुढे म्हणाली.

तमन्नाची 'नोव्हेंबर स्टोरी' ही सीरिज नुकतीच डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली. ती लवकरच टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे. एका तेलुगू कुकींक शोचं ती सूत्रसंचालन करणार आहे. त्याचप्रमाणे 'अंधाधून' या हिंदी चित्रपटाच्या तेलुगू रिमेकमध्येही ती काम करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com