Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री दीपाचं निधन; आत्महत्येपूर्वीची संशयास्पद नोट चर्चेत

त्या संशयास्पद नोट मध्ये खूप काही लिहीलं होतं
Tamil Actress Deepa aka Pauline Jessica:
Tamil Actress Deepa aka Pauline Jessica:esakal

साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून एक दु:खद बातमी पुढे येतय. दीपा या प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचं निधन झालं असून तिचा मृतदेह चेन्नईमधील तिच्या अपार्टमेंटमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळाला. दीपाने आत्महत्या केली असावी असा संशय आहे. तिचा मृतदेह १८ सप्टेंबर रोजी पंख्याला लटकलेला आढळला होता. दीपाचं वय केवळ २९ वर्षे आहे. पोलीसांना तिच्या खोलीतून एक संशयास्पद नोटही मिळाली आहे.

दीपा या प्रसिद्ध अभिनेत्रीने आत्महत्या केल्याच्या बातमीने दाक्षिणात्या सिनेसृष्टीला मोठा धक्काच बसला आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार दीपाचा सगळ्यात जवळचा मित्र प्रभाकरण सगळ्यात आधी घटनास्थळी पोहोचला. मृतदेह बघताच आंध्रप्रदेशमध्ये राहाणाऱ्या तिच्या भावाला घटनेची कल्पना देण्यात आली. कोयंबडू येथील पोलिसांना त्याने सदर घटनेची माहिती देताच पोलीस दीपाच्या राहत्या घरी पोहोचले. या प्रकरणाचा पोलींसाकडून तपास सुरू आहे.

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी दीपाच्या खोलीतून एक डायरीही जप्त केली आहे. अभिनेत्रीला तिचे आयुष्य नकोसे होते, कारण तिला तिच्या आयुष्यात पाठिंबा देणारे कोणी नव्हते, असे तिने लिहीले असल्याचीही माहिती पुढे येतेय. तिचे कोणावर तरी प्रेम होते पण त्याने तिचा स्वीकार केला नव्हता. डायरीमधील हा मजकुर वाचल्यानंतर पोलीस आता या मुलाचा शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com