'तान्हाजी'मधल्या मराठमोळ्या धैर्यचं मालिकेत पदार्पण

स्वाती वेमूल
Tuesday, 23 February 2021

'या' मालिकेत साकारणार खलनायकी भूमिका

ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' या चित्रपटातून अभिनेता धैर्य घोलपने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तान्हाजी मालुसरेंच्या सैन्यातल्या मावळ्याची भूमिका धैर्यने साकारली होती. खलनायक उदयभान सिंहच्या (सैफ अली खान) हातून या मावळ्याचा मृत्यू होताना चित्रपटात दाखवलं आहे. आता धैर्य मालिकाविश्वात पदार्पण करत आहे. कलर्स वाहिनीवरील 'बावरा दिल' या मालिकेत धैर्य सरकार ही नकारात्मक भूमिका साकारणार आहे. 

मालिकेतील खलनायकी भूमिकेसाठी 'तान्हाजी'मधल्या सैफच्या भूमिकेतून प्रेरणा घेतल्याचं तो सांगतो. "मला नेहमीच नकारात्मक पात्रांबद्दल विशेष आकर्षण वाटत आलंय. याचं कारण म्हणजे खलनायकी भूमिकांमध्ये भावनांच्या अनेक छटा साकारायला मिळतात. त्यामुळे आपल्यातल्या अभिनेत्याचा त्यामुळे कस लागतो, असं मला वाटतं. ओम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सैफ असील खान हे उदयभान सिंहची भूमिका कशी साकारत होते, ते मी खूप जवळून पाहिलंय. त्याचा फायदा मला आता सरकार ही भूमिका साकारताना होणार आहे", असं तो म्हणाला. 

हेही वाचा : करीनाच्या मुलाचा पहिला फोटो आला समोर; तुम्ही पाहिलात का?

हेही वाचा : दहा वर्षात एक 'सैराट' बनून काय उपयोग? गश्मीर महाजनीची रोखठोक भूमिका
 

करिअरच्या सुरुवातीलाच नकारात्मक भूमिका मिळाली म्हणून निराश न होता तो या संधीकडे फार सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत आहे. यासाठी त्याने निर्माते निखिल शेठ आणि कल्याणी पठारे यांचे आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tanhaji the unsung warrior fame actor dhairya gholap to debut in serial