Tanishaa Mukerji : 'लग्न ही गोष्ट अशा लोकांसाठी आहे जे...' काजोलची बहीण तनिषानं स्पष्टच सांगितलं

तनिषा मुखर्जीनं (Tanishaa Mukerji News) तिच्या आगामी प्लॅन्सविषयी सांगितलं आहे.
Tanishaa Mukerji Latest news
Tanishaa Mukerji Latest newsesakal

Kajol sister Tanishaa Mukerji : तनिषा ही प्रसिद्ध अभिनेत्री काजोलची बहीण म्हणून लोकप्रिय असली तरी तिनं देखील तिच्या अभिनयानं स्वताचा वेगळा असा चाहतावर्ग तयार केला आहे.सोशल मीडियावर अॅक्टिव्ह (Kajol sister Tanishaa Mukerji news) असणाऱ्या तनिषानं आता लग्नाच्याबाबत केलेली टिप्पणी ही लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

काही वर्षांपूर्वी तनिषा ही अभिनेता अरमान कोहलीला डेट करत (Tanisha Latest News About Wedding) असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. वर्षभर त्याला डेट केल्यानंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. आता ती एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

लग्नाचा प्रश्न विचारला तेव्हा काय म्हणाली?

तनिषा म्हणते की, लग्नाबाबत माझे विचार वेगळे आहेत. लग्न ही एक (Bollywood Actress) अशी गोष्ट आहे ज्यामध्ये दोन्ही व्यक्ती एकमेकांना समजून घेतात. त्यांच्यात सुसंवाद असतो. त्या दोन्ही व्यक्ती एकमेकांसाठी एका संस्थेसारख्या असतात ज्यांची मुळं संवादात आहेत. जे हे नात्याला समजतात त्यांचा प्रवास सुखकर होऊन जातो.

मला तुम्ही जेव्हा लग्नावरुन काही प्रश्न विचारु लागता तेव्हा माझे म्हणणे आणखी वेगळे होऊन जाते. मी मला आलेल्या प्रस्तावांचा विचार करु लागते पण ती गोष्ट पुढे काही सरकायला मागत नाही. प्रत्येकाला वाटते की, त्याच्या आय़ुष्यात एका चांगल्या व्यक्तीची एंट्री व्हावी जेणेकरुन त्याच्यासोबत आपल्याला प्रवासाला सुरुवात करता येईल. अशा शब्दांत तनिषानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Tanishaa Mukerji Latest news
Jaya Bachchan : 'मूर्ख आहेत 'त्या' मुली ज्या डेटवर जाऊन...' नातीच्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन काय बोलून गेल्या?

मराठी चित्रपटात झळकणार?

तनिषाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगायचे झाल्यास ती एका फिल्मी क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या कुटूंबातून येते. तिचे वडील शोमू मुखर्जी हे प्रसिद्ध निर्माते म्हणून लोकप्रिय होते. त्यांची आई तनुजा ही ८० च्या दशकांतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली गेली. तर बहीण काजोल अजुनही बॉलीवूडमधील चर्चेतील अभिनेत्री आहे.

तनिषानं देखील आतापर्यत वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती मराठी चित्रपटामध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. २००३ मध्ये तनिषानं बॉलीवूडमध्ये डेब्यू केलं होतं. मात्र तिच्या अभिनयाला प्रेक्षकांचा म्हणावा असा प्रतिसाद प्रेक्षकांकडून काही मिळाला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com