
‘मी प्रियांकाची शत्रू आहे हे दाखवण्यासाठी काही लोक वेडे झाले’
प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन (Taslima Nasreen) नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. प्रियांका चोप्रा (priyanka chopra) आणि निक जोनास (nick jonas) सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्यानंतर तस्लिमा यांनी अशा पालकांवर निशाणा साधला. त्यांच्या वक्तव्यानंतर चांगलाच वाद झाला. यावर स्पष्टीकरण देताना ‘मी प्रियांकाची शत्रू आहे हे दाखवण्यासाठी काही लोक वेडे झाल्याचे त्या म्हणाल्या.
प्रियांका चोप्रा (priyanka chopra) आणि निक जोनास सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्यानंतर तस्लिमा (Taslima Nasreen) यांनी तीन ट्विट केले होते. गरीब महिला असल्यामुळे सरोगसी शक्य आहे. श्रीमंत लोकांना नेहमीच त्यांच्या स्वार्थासाठी समाजात गरिबी लोकांची गरज असते. जर तुम्हाला एखादे मूल वाढवायचे असेल तर दत्तक घ्या. आपले संस्कार वंशाच्या मुलांनाच मिळायला हवेत हा अत्यंत स्वार्थी विचार आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.
हेही वाचा: ‘विवस्त्र डान्स’ प्रकरण : पोलिसांनी केली दहा जणांना अटक
दुसऱ्या ट्विटमध्ये, सरोगसीच्या माध्यमातून बाळाची आई होणाऱ्या महिलांना आई झाल्याची अनुभूती कशी येणार? मुलाला जन्म देताना जशी भावना एका आईची असते तशीच भावना त्यांनाही असेल का, असा प्रश्न तस्लिमा यांनी विचारला होता. जोपर्यंत श्रीमंत महिला सरोगसीद्वारे आई बनत नाहीत तोपर्यंत मी सरोगसी स्वीकारणार नाही. जोपर्यंत पुरुष प्रेमाने बुरखा घालत नाही तोपर्यंत मी बुरखा स्वीकारणार नाही. जोपर्यंत पुरुष देहविक्रीस तयार होत नाहीत आणि पुरुष महिला ग्राहकांची वाट पाहत नाहीत तोपर्यंत मी वेश्याव्यवसाय स्वीकारणार नाही. अन्यथा सरोगसी, बुरखा, देहविक्री हे फक्त महिला आणि गरिबांचे शोषण असल्याचे त्या (Taslima Nasreen) तिसऱ्या ट्विटमध्ये म्हणाल्या होत्या.
हेही वाचा: ‘असा झाला तथाकथित गावगुंड मोदी तयार’
यानंतर चांगलेच वादंग झाले. यावर स्पष्टीकरण देताना तस्लिमा नसरीन (Taslima Nasreen) म्हणाल्या, ‘मी प्रियांकाची शत्रू आहे हे दाखवण्यासाठी काही लोक वेडे झाले आहेत. परंतु, मी नेहमीच तिचे कौतुक करते. वेश्याव्यवसाय, बलात्कार, सरोगसी, कौटुंबिक हिंसाचार, पुरुष वर्चस्व, पितृसत्ता या विषयांवर मी अनेकदा बोलते.’ आपण बरोबर बोलत असल्याचे दाखवण्यासाठी त्यांनी ‘प्रियांका चोप्रा (priyanka chopra) आणि निक जोनाससाठी (nick jonas) आनंदी आहे. सुंदर जोडपे.’ असे जुने ट्विटही शेअर केले आहे.
Web Title: Taslima Nasreen Priyanka Chopra Nick Jonas Surrogacy Tweet War
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..