Tejaswini Pandit: "ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत?", फडणवीसांचा व्हिडिओ शेअर करत तेजस्विनीची टिका

Tejaswini Pandit On Toll
Tejaswini Pandit On Toll Esakal

Tejaswini Pandit On Toll: राज्यात सध्या रस्त्याच्या टोलचा मुद्दा चर्चेत आला आहे. अनेक कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत टोल वसूल करणाऱ्यांवर टीका केली होती. तर आता टोल विरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

तर टोल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे उपोषणाला बसले होते. गेले चार दिवस त्यांचे उपोषण सुरु होते.

Tejaswini Pandit On Toll
Me Honar Superstar Chhote Ustaad 2: ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 2’ मध्ये जालन्याच्या संकल्पने मारली बाजी!

या टोल मुद्यावर मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने देखील एक ट्वीट शेयर करत काही प्रश्न उपस्थीत केले आहेत.

तेजस्वीनीने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे. जो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. फडणवीस या व्हिडिओत पत्रकारांशी संवाद साधत आहेत. "राज्यातील सगळ्या टोलवर चारचाकी आणि छोट्या गाड्यांना मुक्ती दिली आहे. महाराष्ट्रातील टोलवर आपण फक्त कमर्शियल-मोठ्या गाड्यांचे टोल घेतो." असं देवेंद्र फडणवीस या व्हिडिओत म्हणत आहे.

तर या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तेजस्वीनी लिहिते की, "म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ??????? ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत? मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय? राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा, महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून!! हे "माननीय उपमुख्यमंत्री" यांचे विधान कसे असू शकते?अविश्वसनीय!! तुमचीही फसवणूक झाली असे वाटत असेल तर शेअर करा!"

#सगळेहुकलेत #अवघडआहेबुवा #महाराष्ट्रजागाहो असे हॅशटॅग तिने वापरले आहेत.

सध्या सोशल मीडियावर तेजस्वीनीचे हे ट्विट व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओला प्रतिक्रिया देत आहेत. तर अनेकांनी तिचे समर्थन केले आहे.

Tejaswini Pandit On Toll
Nushrratt Bharuccha: "किती मोठी ड्रामा क्वीन अन् निर्लज्ज बाई", इस्राइलहून भारतात परतणाऱ्या नुसरतवर अभिनेत्याची टीका...

तर दुसरीकडे महामार्गावरील टोल वाढीवर मनसे नेते अविनाश जाधव उपोषणाला बसले होते. यानंतर राज्य सरकरकडून पत्र आले होते, ज्यामध्ये टोलबद्दल सर्व माहिती देण्यात आली होती. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत काही व्हिडिओ शेयर केले आणि अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

Tejaswini Pandit On Toll
Mitali Mayekar: "तुझ्या बुद्धीच्या पलीकडे...!" नेटकऱ्याने टिका करताच मितालीचं सडेतोड उत्तर म्हणाली,"तुम्ही क्लास घेता का?"

आपलं टोलचं आंदोलन २००९-१०च्या सुमारास सुरू झालं, हा टोलचा सगळा कॅशमधला पैसा जातो कुठे? याचं होतं काय? आणि त्याच त्याच कंपन्यांना हे टोल मिळतात कसे?

शहरातील रस्त्यांवर खड्डे पडणार असतील तर हे पैसे जातात कुठे असा प्रश्न पडतो असे अनेक प्रश्न उपस्थीत करत राज ठाकरे यांनी सरकारला घेरले आहे. आता यावर राज्य सरकार काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com