Marathi Bhasha Gaurav Din: "शिकत राहावी, समजत राहावी अशी ही आपली माय मराठी"; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी कलाकारांच्या खास पोस्ट

Marathi Bhasha Gaurav Din: प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit), अभिनेता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi), अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) यांनी पोस्ट शेअर करुन चाहत्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
marathi celebrity
marathi celebrityesakal

Marathi Bhasha Gaurav Din:  मराठी भाषा गौरव दिनानिमित्त (Marathi Bhasha Gaurav Din) आज अनेक जण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आहेत. काही मराठी कलाकारांनी देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit), अभिनेता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi), अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) यांनी पोस्ट शेअर करुन चाहत्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

तेजस्विनी पंडितची पोस्ट

तेजस्विनी पंडितनं ट्वीटमध्ये लिहिलं, "जगत राहावी, शिकत राहावी, समजत राहावी अशी ही आपली “माय मराठी “ आपल्यासाठी अभिजातच राहणार ! ‘मराठी’साठी अनंत काळ झटलेल्या आणि आता मराठी टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रत्येकाला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!"

स्वप्निलनं शेअर केला व्हिडीओ

स्वप्निलनं एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये स्वप्निल राघव आणि मायरा यांच्यासोबत मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. या व्हिडीओला स्वप्निलनं कॅप्शन दिलं, "आमच्या कडून तुम्हा सर्वांना “मराठी भाषा गौरव” दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!"

पाहा व्हिडीओ

marathi celebrity
Sonalee Kulkarni : 'बाराखडी गिरवताना कुठं माहिती होतं की…', ‘मराठी भाषा गौरव दिनी’ सोनाली काय म्हणाली?

अभिनेता अभिजित केळकरनं सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन त्यानं मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच हेमांगी कवीनं देखील खास पोस्ट शेअर करुन मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com