esakal | Bigg Boss 14; ' निकाल जेव्हा यायचा तेव्हा येईल, रूबीनाच विजेती '; ऑडियन्स पोल व्हायरल 
sakal

बोलून बातमी शोधा

 televison actress rubina dilaik announced winner of bigg boss 14 on opinion poll

बिग बॉसच्या अंतिम फेरीमध्ये रूबीनानं बाजी मारली आहे असं सांगणारा पोल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Bigg Boss 14; ' निकाल जेव्हा यायचा तेव्हा येईल, रूबीनाच विजेती '; ऑडियन्स पोल व्हायरल 

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बिग बॉसच्या 14 व्या सीझनच्या अंतिम स्पर्धेतील विजेता कोण असणार यावर काही वेळातच शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र त्यापूर्वीच चाहत्यांनी सोशल मीडियावर यंदाच्या सीझनमधील विजेत्याची नाव घोषित करुन टाकले आहे. रुबीना दिलेर हीच विजयी होणार असल्याची शक्यता तिच्या चाहत्यांनी व्य़क्त केली आहे. एवढेच नव्हे तर सोशल मीडियावर तिनं आपल्याला मिळालेल्या वोटिंग पोलची माहिती शेअर केली आहे. यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बिग बॉसच्या अंतिम फेरीमध्ये रूबीनानं बाजी मारली आहे असं सांगणारा पोल सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. रूबीनाला ज्याच्याकडून कडवे आव्हान आहे असा एक स्पर्धक आहे तो म्हणजे राहूल वैद्य. त्याच्या आणि तिच्या पॉइंटमध्ये केवळ तीन टक्क्यांचा फरक आहे. असे दिसून आले आहे. वास्तविक थोड्यावेळानंतर बिग बॉसच्या विजेत्याचे नाव समोर येणार असले तरी घरबसल्या लोक कोण विजेती होणार याविषयी सांगू लागले आहेत. त्यात रूबीनाचं नाव अग्रक्रमांकावर आहे. सध्य़ाच्या घडीला संभाव्य विजेती म्हणून रुबीनाला सर्वाधिक पसंती मिळताना दिसत आहे.

बिग बॉसच्या चाहत्यांकडूनही रूबीनाला पसंती मिळत आहे. एकवेळ राखीच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र ती या स्पर्धेत मागे पडली. आतापर्यत वेगवेगळे ओपिनयन पोल घेण्य़ात आले आहे. त्यात रूबीनाचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. बाकीच्या स्पर्धकांच्या तुलनेत रुबीना कित्येक पावले पुढे आहे. मात्र फायनल विनर कोण असणार हे सलमानच सांगु शकणार आहे. त्या नावासाठी प्रेक्षकांना आणखी काही वेळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

अंतिम फेरी मध्ये अली गोनी, राखी सावंत, निक्की तांबोळी, राहूल वैद्य आणि रूबीना दिलेक यांचा समावेश आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुबीनाची जिंकण्याची शक्यता आहे. रुबीनाला आतापर्यत 35 टक्के प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तर राहूलला 34.5 टक्के प्रेक्षकांनी वोटिंग केले आहे. त्यामुळे या दोघांमध्ये नेमकं कोण जिंकणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. राहूल वैद्य आणि अली गोनीनं मध्ये काट्याची टक्कर आहे. तर राखी सावंत आणि निक्की तांबोळी शेवटच्या स्थानावर आहे.

हेही वाचा : प्रिया बापटलाही लागलं 'पावरी'चं याड; पाहा धमाल व्हिडीओ

हेही वाचा : बाळाच्या जन्माआधी करीनाची चाहत्यांसाठी महत्त्वपूर्ण पोस्ट

रूबीना ही एक टेलिव्हिजन क्षेत्रात काम करणारी अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिचा फॉलोअर्सही मोठा आहे. तिनं छोटी बहु या मालिकेपासून सुरुवात केली. मात्र त्यातून ती लोकप्रिय झाली. त्यानंतर शक्ति मधील तिनं साकारलेली किन्नराची भूमिकाही गाजली. 33 वर्षीय रूबीना ही मुळची शिमला  येथे राहणारी आहे. तिला आयएएस व्हायचं होतं. 2008 मध्ये चंदीगढमध्ये छोटी बहुचे ऑडिशन सुरु होते. तेव्हा तिनं त्यात भाग घेतला होता. त्यानंतर तिचं आयुष्यच बदलून गेलं.