Tere ishq main: आनंद एल राय आणि धनुषच्या 'तेरे इश्क में'ची लागली प्रेक्षकांना ओढ! ट्विटरवर ट्रेंड व्हायरल

tere ishq main
tere ishq mainSakal

Tere ishq main: साऊथ सुपरस्टार धनुष आणि बॉलीवुड ला ब्लॉक बस्टर सिनेमा दिणारे आनंद एल रॉय या जोडी चा सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ही जोडी तब्बल दहा वर्षानंतर बॉलीवूड सिनेमा करत आहे.

tere ishq main
Shah Rukh Khan : 'शाहरुख हेल्मेट कुठयं'? मुंबई पोलिसांनी टोचले कान

आनंद एल रॉय यांनी दिनदर्शित केलेल्या " रांझना " या चित्रपटातून साऊथ च्या धनुष ने बॉलीवूड मध्ये दमदार एंट्री केली. आनंद यांच्या मनमोहक कथा आणि उत्कृष्ट दिग्दर्शनाची भारतीय चित्रपट क्षेत्रात एक अनोखी शैली आहे.

दिग्दर्शक आनंद एल राय हे त्यांच्या अतुलनीय कामासाठी ओळखले जातात. तर नुकताच त्यांच्या सुपरहिट " रांझना " ला 21 जून रोजी 10 वर्ष पूर्ण झाली असून या खास दिवसाचं औचित्य साधत आनंद एल राय आणि सुपरस्टार धनुष यांनी आगामी 'तेरे इश्क में' चित्रपटाची ची घोषणा केली आहे . या बहुप्रतिक्षित घोषणेने चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे.

आनंद रॉय यांनी बॉलिवूड ला तनु वेड्स मनू , अतरंगी रे, रक्षाबंधन, झीरो, हॅप्पी भाग जायेणगी यांसारखे अनेक रोमॅंटिक आणि कॉमेडी चित्रपटे दिली . त्यांचा " रांझना " हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला. यात साऊथ अभिनेता धनुष आणि सोनल कपूर यांची केमिस्ट्री दाखवण्यात आली होती.

tere ishq main
Adipurush Collection: बॉक्स ऑफिस युद्धात 40 कोटी बजेट असेलला सारा विकीचा सिनेमा 600 कोटीच्या आदिपुरुषवर पडला भारी...

हा चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरक्ष डोक्यावर घेतला होता. आता हीच जोडी पुन्हा एकदा " तेरे इश्क में " नावाचा चित्रपट घेऊन येत आहे. " तेरे इश्क में " मध्ये आनंद एल राय यांच्या दिग्दर्शनाची चमक आणि धनुषची अप्रतिम अभिनय प्रतिभा यांचा अनोखा संगम पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

tere ishq main
Tamannaah Bhatia: आधी पाया पडली आणि मग.. फॅनची क्रेझ पाहून तमन्नाही लागली रडायला, व्हिडिओ व्हायरल

'रांझना' आणि 'अतरंगी रे' मधील त्यांच्या मोठ्या प्रमाणावर आवडलेल्या सहकार्यानंतर, अभिनेता-दिग्दर्शक जोडीने तेरे इश्क में सोबत प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आणखी एक सिनेमॅटिक कलाकृती तयार करण्याचे ठरवले आहे. सोशल मीडिया वर या चित्रपटाच्या चर्चांना उधाण आलं आणि याच्या खास व्हिडिओ ने नेटिझन्सला भुरळ पाडली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com