नोरा फतेही सोबतचा तो व्हिडिओ ''मॉर्फ '' केलेला; नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लेविस होतोय ट्रोल 

Something like that would only tickle a 17-year-old I am a man said by  terencr lewis
Something like that would only tickle a 17-year-old I am a man said by terencr lewis

मुंबई - प्रख्यात नृत्यांगणा नोरा फतेही आणि नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लेविस यांचा नृत्य करतानाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र त्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. यामुळे टेरेन्स लेविसवर प्रेक्षकांनी जोरदार टीका सुरु केली आहे. यासगळ्यावर लेविसने तो व्हिडिओ ''मॉर्फ '' केलेला असल्याचे म्हटले आहे. अशाप्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे.

सध्या मोठ्या प्रमाणावर कलाकारांचे फोटो, व्हिडिओ यात वेगवेगळ्या प्रकारे बदल करण्याची गोष्ट काही नवीन नाही. यापूर्वी देखील अनेक बॉलीवूड कलाकारांचे फोटो ''मॉर्फ '' करुन ते व्हायरल करण्यात आले आहे. मात्र टेरेन्सने त्याच्या आणि नोरा फतेहीसमवेतच्या त्या व्हिडीओवर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरही टेरेन्सने मत व्यक्त केले आहे. तो म्हणतो, मला प्रेक्षक एखादा ''मॉर्फ केलेला व्हिडिओ पाहतात. आणि त्यावर आपले मत व्यक्त करतात. जो व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे त्यात करण्यात आलेली कृती ही एका 17 वर्षाच्या मुलाला गुदगुदगुल्या करण्यासारखी आहे.

आठवड्यापासून टेरेन्सला टीकेला सामोरे जावे लागत आहे. या व्हिडिओमध्ये टेरेन्स आणि नोरा दोघेही नृत्य करत आहेत. मात्र ''मॉर्फ  करण्यात आलेल्या व्हिडिओत बदल करण्यात आल्याने ते दोघेही थट्टेचा विषय झाले आहेत. यावरुन प्रेक्षकांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. यावर नोरा फतेही हिने टेरेन्सची बाजू घेऊन याप्रकरणावर पडदा टाकला आहे. तसेच याविषयी अधिक चर्चा करण्यासारखे काही नाही असेही ती सांगितले. 

एका वृत्तवाहिनीशी बोलताना टेरेन्स म्हणाला, मी पहिल्यांदा हा व्हिडीओ पाहिला तेव्हा मला धक्का बसला. त्यात करण्यात आलेले बदल हे कुणा एका जाणकाराला सहजच जाणवतील.सध्य़ाच्या घडीला अशाप्रकारचे ''मॉर्फ व्हिडिओ तयार करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले जाते. याप्रकारच्या वेडेपणाला जास्त भाव देण्याची गरज नाही. मी याचा फारसा विचार करत नसल्याचे टेरेन्सने म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com