
धर्मवीरचा 'आनंद' भिडला गगनाला, पहिल्याच दिवशी 2 कोटींची कमाई
प्रविण तरडे दिग्दर्शित आणि मंगेश देसाई निर्मित 'धर्मवीर मु,पोष्ट.ठाणे'(Dharmaveer) हा बहुचर्चित सिनेमा अखेर १३ मे,२०२२ रोजी प्रदर्शित झाला आहे. तब्बल ४०० हून अधिक सिनेमागृहातनं १० हजारांहून अधिक स्क्रीनवर हा सिनेमा झळकला आहे. अर्थात हा सिनेमा दिवंगत शिवसेना नेते,माजी शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख आणि त्याहून अधिक सर्वांचे लाडके आनंद दिघे साहेब यांच्या आयुष्यावर आधारित असल्यामुळे सिनेमाला दमदार ओपनिंग मिळणार हे अपेक्षित होते. आणि झालंही नेमक तसंच. सिनेमानं पहिल्याच दिवशी तब्बल २ कोटींच्या जवळपास कमाई केली आहे.
हेही वाचा: 'बाळासाहेबांनी आदेश देऊनही आनंद दिघेंनी तो पाळला नव्हता कारण...'- प्रसाद ओक
धर्मवीर सिनेमा पडद्यावर पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये सिनेमाची चर्चा सुरु झाली तेव्हापासूनच पहायला मिळाली. आणि त्यात आनंद दिघेंसारखा(Anand Dighe) सिनेमात हुबेहूब दिसणारा प्रसाद ओक(Prasad oak), दिघे साहेबांसारखीचं प्रसादनं त्याच्या नजरेतनं दाखवलेली जरब, अचूक पकडलेली देहबोली,सिनेमातली संवादफेक हे सारं पाहून 'आनंद दिघे साहेब परत आले' ही सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झालेली भावूक भावना खरंतर या सगळ्याच गोष्टींनी सिनेमा पाहण्याची उत्सुकता वाढवली होती. आणि सिनेमाला पहिल्या दिवशी मिळालेल्या ओपनिंगनं हे सिद्ध देखील केलं आहे.
हेही वाचा: अमिताभनी 'या' कारणानं डिलीट केली कंगनासाठी लिहिलेली पोस्ट; ब्लॉगमधून खुलासा
प्रविण तरडेचं अभ्यासपूर्ण दिग्दर्शन अन् त्याला प्रसाद ओकची अभिनयाच्या माध्यमातून मिळालेली साथ यामुळे 'धर्मवीर' सिनेमा प्रेक्षकांना भावला हे नक्कीच म्हणता येईल. त्यात गेल्या काही दिवसांत प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमांनी बॉक्सऑफिसवर केलेली तगडी कमाई पाहून आता 'धर्मवीर'ही ती विक्रमी घोडदौड पुढे सुरू ठेवील अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत. आता लेक्ष ठेवायचं ते 'धर्मवीर' सिनेमा बॉक्सऑफिसवरचे(Boxoffice) कोणते रेकॉर्ड कसे तोडतो याकडे.
Web Title: Dharmaveer Marathi Movie First Day Boxoffice
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..