फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीझनची तारीख ठरली! 'यादिवशी' होणार स्ट्रिमिंग | The Family Man 3 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 The Family Man 3

The Family Man 3 : फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीझनची तारीख ठरली! 'यादिवशी' होणार स्ट्रिमिंग

The Family Man Season 3 Manoj Bajpayee share date announced : टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये गेल्या काही वर्षांपासून ओटीटीनं आपला वेगळा ठसा उमटवला आहे. खासकरुन कोरोनाच्या काळामध्ये ओटीटीनं प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. यासगळयात बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्यांच्या मालिका प्रदर्शित झाल्या होत्या. त्यात सर्वाधिक चर्चा होती ती द फॅमिली मॅन या सीझनची.

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीनं आता द फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीझनबाबत घोषणा केली आहे.त्यामुळे चाहत्यांना कमालीचा आनंद झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षक, चाहते फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेनं वाट पाहत आहेत. यासगळ्यात फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीझनविषयी खुद्द मनोजनेच सांगितल्यानं चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

भारतामध्ये सर्वाधिक चर्चेतील आणि लोकप्रिय झालेल्या ज्या मालिका आहेत त्यामध्ये मनोज वाजपेयीच्या द फॅमिली मॅनचे देखील नाव घ्यावे लागेल. फॅमिली मॅनचा पहिला सीझन हा २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. फिल्ममेकर्स निदीमोरु आणि कृष्णा डीके यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केले होते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांच्या सर्वाधिक आवडीची मालिका झाली आहे. त्यातील कथानक, कलाकारांचा अभिनय आणि प्रभावी मांडणी यामुळे फॅमिली मॅन ही कमालीची उत्कंठावर्धक झाल्याचे दिसून आले आहे.

दुसऱ्या सीझनला देखील विक्रमी प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांनी तिसरा सीझन कधी प्रदर्शित होणार असा सवाल मेकर्सला विचारला आहे. त्यानंतर मनोजनं अखेर तिसऱ्या सीझनविषयी दिलेली प्रतिक्रिया आता नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय असून तो सोशल मीडियावर ट्रेडिंग आहे.

व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये मनोजनं फॅमिली मॅनच्या तिसऱ्या सीझनची तारीख आणि वेळ सांगितली आहे. मनोजनं त्या व्हिडिओमध्ये होळीच्या दरम्यान फॅमिली मॅनचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगत प्रेक्षकांना सरप्राईज दिले आहे.त्यावरुन चाहत्यांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.