सासुरवाडीत कतरिनाने बनवला पहिला पदार्थ; पहा फोटो

कतरिनाने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला फोटो
Katrina Kaif
Katrina Kaiffile

नवविवाहित अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) हे राजस्थानहून मुंबईला परतले. मुंबईला परतल्यानंतर कतरिनाने सासुरवाडीत पहिला पदार्थ बनविला आहे. या पदार्थाचा फोटो तिने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. कतरिनाने लग्नानंतर तिचा इन्स्टाग्रामवरील प्रोफाइल फोटोसुद्धा बदलला आहे. लग्नसोहळ्यातील विकीसोबतचा फोटो तिने आता प्रोफाइलवर ठेवला आहे. लग्नानंतर सून तिच्या कुटुंबीयांसाठी पहिला पदार्थ काहीतरी गोड बनवते. कतरिनानेसुद्धा ही परंपरा पाळत सासरच्यांसाठी गोड पदार्थ बनविला आहे. (Vicky Katrina Wedding)

कतरिनाने शिरा बनवला असून त्याचा फोटो तिने इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. 'मैने बनाया, चौंका चढाना' असं लिहित तिने हसण्याचा इमोजी पोस्ट केला आहे. कतरिना-विकीने ९ डिसेंबर रोजी राजस्थानच्या सवाई माधोपूर याठिकाणी सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारामध्ये लग्न केलं. या शाही लग्नसोहळ्याची देशभरात चर्चा होती. या लग्नसोहळ्यातील कतरिनाच्या प्रत्येक लूकची सोशल मीडियावर चर्चा झाली. तिच्या लूकमधील बारिकसारिक गोष्टींनीसुद्धा चाहत्यांचं लक्ष वेधलं. १४ डिसेंबर रोजी ही नवविवाहित जोडी मुंबईत परतली. यावेळी पंजाबी ड्रेसवर लाल बांगड्या, मंगळसूत्र आणि सिंदूर अशा लूकमध्ये कतरिना पहायला मिळाली. तिच्या या लूकचीही चर्चा सोशल मीडियावर जोरदार झाली.

Katrina Kaif
सुंदरा मनामध्ये भरली: मालिकेतील दृश्यामुळे प्रेक्षक भडकले

लग्नानंतर विकी-कतरिना एकत्र करणार काम?

विकी आणि कतरिनाने आतापर्यंत कोणत्याच चित्रपटात एकत्र काम केलं नव्हतं. मात्र लग्नानंतर ही जोडी एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याचं कळतंय. 'ई टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांनी नवीन प्रोजेक्ट साइन केला आहे. यासोबतच एका मोठ्या ब्रँडच्या जाहिरातीतसुद्धा ही जोडी एकत्र दिसणार असल्याचं कळतंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com