Kapil Sharma Show मध्ये इतकं तगडं मानधन देऊन परत आणलंय कृष्ण अभिषेकला.. या पैशावरनंच बिघडलेल्या गोष्टी

कृष्णा अभिषेकी हा कपिल शर्मा शो मधील हुकमाचा इक्का होता,त्याच्या नसण्यानं टीआरपीवर झालेला परिणाम पाहता अभिनेत्याला पुन्हा शो मध्ये सामिल केलं गेलं.
Krushna Abhishek Fee, The kapil Sharma Show
Krushna Abhishek Fee, The kapil Sharma ShowEsakal

Kapil Sharma Show: कॉमेडी अभिनेता कृष्णा अभिषेकला कोणत्याही परिचयाची खरं तर गरज नाही. 'द कपिल शर्मा शो' मध्ये सपना ही व्यक्तिरेखा साकारल्यानंतर तो घराघरात प्रसिद्ध झाला.

कृष्णा 'द कपिल शर्मा शो' मधील खूप महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारायचा. आणि प्रेक्षकांना त्याचं ते फनी कॅरेक्टर आवडत देखील होतं. पण सप्टेंबर २०२२ मध्ये कपिल शर्मा शो च्या नव्या सीझनच्या सुरुवातीला समोर आलं की कृष्णा नव्या सीझनचा भाग नसेल

द कपिल शर्मा शो च्या नव्या सीझनमध्ये त्याच्या नसण्यामागे मानधनावरनं गणित फिस्कटल्याचं कारण समोर आलं. पण आता पुन्हा कृष्णा शो मध्ये दिसत आहे,तर चला जाणून घेऊया अखेर तो शो साठी नेमकं असं किती मानधन घेतो. (The kapil sharma show krushna abhishek fee for per episode)

Krushna Abhishek Fee, The kapil Sharma Show
Priyanka Chopra: 'म्हणून मी वॉशरुममध्ये जाऊन लंच करायचे..', अमेरिकेतील दिवसांविषयी प्रियंकाचा खळबळजनक खुलासा

आता 'द कपिल शर्मा शो'मध्ये प्रेक्षकांच्या लाडक्या कृष्णा अभिषेकची धमाकेदार एन्ट्री होणार आहे, आणि प्रेक्षकही या एपिसोडची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. कृष्णा शो मध्ये नव्हता तेव्हा त्याला परत आणण्याची जोरदार मागणी त्याच्या चाहत्यांकडून झाली होती. कृष्णा साकारत असलेल्या सपनाला सगळेच मिस करत होते. पण ही सपना साकारण्यासाठी कृष्णा अभिषेक किती तगडं मानधनं घेतो हे माहिती आहे का तुम्हाला?

सियासत च्या एका रिपोर्टवरनं समोर आलं आहे की,कृष्णा प्रत्येक एपिसोडसाठी १० ते १२ लाख चार्ज करतो. आपल्या एका मुलाखतीत कृष्णानं 'कपिल शर्मा शो' मध्ये न दिसण्याचं कारण पैशाचा मुद्दा असं सांगितलं होतं.

त्यामुळे आता चर्चा आहे की कृष्णाला त्यानं डिमांड केलेले पैसे मिळाले आहेत बहुधा म्हणूनच तो शो मध्ये परत आला आहे. कृष्णा प्रत्येक एपिसोडसाठी १० लाखाहून अधिक चार्ज करतो. अर्थात अद्याप यावर अधिकृत काही समोर आलेलं नाही. पण नक्कीच हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कृष्णा कॉमेडीच्या दुनियेतला सगळ्यात हरहुन्नरी अभिनेता आहे आणि यात दुमत नसेल.

Krushna Abhishek Fee, The kapil Sharma Show
Sai Tamhankar: आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे..
Krushna Abhishek Fee, The kapil Sharma Show
Madhurani Prabhulkar: 'मन माझे उमलून गेले..स्पर्श तुझा झाला..'

प्रेक्षकांच्या आवडत्या द कपिल शर्मा शो मध्ये कपिल शर्मा,कीकू शारदा,सुमोना चक्रवर्ती, अर्चना पूरण सिंग, गौरव दुबे,सृष्टी रोडे ,इश्तियाक खान, सिद्धार्थ सागर आमि श्रीकांत असे कलाकार देखील आहेत. अर्चना पुराण सिंग जजच्या खूर्चीत बसतात . द कपिल शर्मा शो चा प्रीमियर १० सप्टेंबरला झाला होता आणि प्रत्येक शनिवारी-रविवारी रात्री ९.३० वाजता हा शो सोनी टी.व्ही वर प्रसारित केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com