'द काश्मीर फाइल्स'ला मुंबई उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील|The Kashmir Files Release | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kashmir Files

'द काश्मीर फाइल्स'ला मुंबई उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

The Kashmir Files Release Date: द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे प्रदर्शन होणार की नाही अशी चर्चा होती. अखेर त्यावर न्यायालयानं आपला निर्णय दिला आहे. त्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा (Bollywood News) कंदील दर्शवला आहे. त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. समाधान व्यक्त केले आहे. गेल्या मंगळवारपासून त्यावर सुनावणी सुरु होती. आता (Bollywood Movies) चित्रपटाच्या प्रमोशनचा मार्ग मोकळा झाला आहे. एकानं काही करुन हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती.

आता द काश्मीर फाईल्स नावाचा चित्रपट हा 11 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटाची नेटकरी गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. विवेक अग्निहोत्री हे त्यांच्या हटक्या स्टाईल आणि आशयनिर्मितीसाठी ओळखले जातात. त्यांच्या या चित्रपटाची जाणकार प्रेक्षक, अभ्यासक आणि प्रेक्षक वाट पाहत होते. यापूर्वी विवेक अग्निहोत्री यांच्या ताश्कंद फाईल्स चित्रपटाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याची चर्चाही झाली होती. त्यावरुन वादही निर्माण झाला होता. देशातील वादग्रस्त विषयांवर चित्रपट निर्मिती हे अग्निहोत्री यांचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. आता त्यांच्या द काश्मीर फाईल्सची चर्चा आहे.

हेही वाचा: सरकारी नोकरीचा थाट; हुंड्यासाठी अडून बसलेल्या नवरदेवाचा Video Viral

या चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार, पल्लवी जोशी, चिन्मय मांडलेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून काश्मीर फाईल्सची चर्चा आहे. त्यावरुन सोशल मीडियामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारे नेटकऱी चर्चा करत असतात. यापूर्वी अनुपम खेर यांनी अनेकदा द काश्मीर फाईल्सच्या नावानं पोस्ट शेयर करुन त्याच्याबद्दल वातावरण निर्मिती केली होती. काश्मीर फाईल्सचा जो टीझर व्हायरल झाला होता त्यावरुन तो वेगळ्याच विषयाला हात घालणारा सिनेमा आहे हे नेटकऱ्यांनी ओळखले होते. आतापर्यत काश्मीर या विषयावर ज्या चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती त्यावरुन वाद निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: Pavankhind Movie Video Viral : चिन्मय मांडलेकर यांचा सिनेमागृहातील व्हिडिओ व्हायरल | Sakal Media

Web Title: The Kashmir Files Release Date Court Decision Released 11 March

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top