थिएटरमध्ये धुमाकुळ घातलेला 'काश्मिर फाईल्स' आता OTT वर

चित्रपट रसिकांना त्या विषयाची आवर्जुन दखल घेण्यास (Bollywood News) भाग पाडलेल्या द काश्मिर फाईल्सची (The Kashmir Files) चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.
the Kashmir files
the Kashmir filesesakal

Bollywood Movies: चित्रपट रसिकांना त्या विषयाची आवर्जुन दखल घेण्यास (Bollywood News) भाग पाडलेल्या द काश्मिर फाईल्सची (The Kashmir Files) चर्चा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. विवेक अग्निहोत्री (Entertainment News) दिग्दर्शित या चित्रपटानं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. 1990 मध्ये काश्मिरी पंडितांना (kashmiri pandits) ज्या संकटांचा सामना करावा लागला, त्यांचे विस्थापन कशाप्रकारे झाले हा विषय चित्रपटातून मांडण्यात आला आहे. पल्लवी जोशी, अनुपम खेर, चिन्मय मांडलेकर यांच्या प्रमुख भूमिका चित्रपटामध्ये साकारण्यात आल्या आहेत. 14 कोटींच्या या चित्रपटानं आतापर्यत 30 कोटींची कमाई केल्याचे सांगण्यात आले आहे.

चित्रपटगृहामध्ये धुमाकुळ घालणाऱ्या द काश्मिर फाईल्सनं अनेक चित्रपटांना दणका दिला आहे. त्याचा फटका गंगुबाई आणि झुंडला बसला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करताना दिसतो आहे. दुसरीकडे वेगळ्याच जॉनरच्या राधे श्यामनं तीन दिवसातच शंभर कोटीच्या पुढे कमाई केली आहे. यासगळ्यात काश्मीर फाईल्सला देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये करमुक्त केल्यानं हा चित्रपट थिएटरमध्ये जावून पाहणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. महाराष्ट्रामध्येही हा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी भाजपच्या काही नेत्यांनी केली आहे. आता काश्मीर फाईल्स हा ओटीटीवर येण्यास सज्ज झाला आहे. झी 5 वर पुढील महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

the Kashmir files
The Kashmir Files: अखेर अनुपम खेर यांनी कपिल शर्मा वादावर चुप्पी तोडली

याविषयी अधिक माहिती देताना या चित्रपटाच्या निर्मात्या आणि मुख्य अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी सांगितलं की, आम्ही जेव्हा काश्मिर फाईल्सचं दिग्दर्शन करत होतो तेव्हा अनेक संकटांचा आम्हाला सामना करावा लागला. कोरोनामुळे दोन वर्षे उशिरानं आम्हाला हा चित्रपट प्रदर्शित करावा लागला. त्यात शुटिंगच्या वेळी स्थानिकांना विश्वासात घेऊन शुटींग करावं लागतं होतं. त्याचाही परिणाम चित्रपटाच्या शुटिंगवर झाला होता. अखेर त्यांच्याशी सातत्यानं संवाद साधून आम्हाला द काश्मिर फाईल्स पूर्ण करता आला याचा आनंद आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर देखील येणार आहे. त्याची प्रक्रिया सुरु आहे.

the Kashmir files
The Kashmir Files: बत्तीस वर्षांपासून दाटलेल्या हुंदक्याला वाट मिळाली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com