नुसरत जहांचं लग्न वैध की अवैध? पहिल्या लग्नाबाबत कोर्टाने दिला निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नुसरत जहांचं लग्न वैध की अवैध? पहिल्या लग्नाबाबत कोर्टाने दिला निर्णय

नुसरत जहांचं लग्न वैध की अवैध? पहिल्या लग्नाबाबत कोर्टाने दिला निर्णय

कोलकाता: बंगाली अभिनेत्री आणि खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan) हीचं पहिलं लग्न गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत राहिलं आहे. त्यासंदर्भातच आता कोलकाता हायकोर्टाने एक निर्णय दिला आहे. कोलकाता हायकोर्टाने आज पारित केलेल्या आदेशामध्ये नुसरत जहांचं म्हणणं खरं ठरवत तिचं पहिलं लग्न बेकायदेशीर ठरवलं आहे. ती मुस्लिम असून निखिल जैन हिंदू आहे. कोर्टाने म्हटलंय की, स्पेशल मॅरेज ऍक्ट अंतर्गत दोघांचंही लग्न झालेलं नाहीये.

हेही वाचा: कंगना राणावत म्हणते, वीर दासवर कडक कारवाई करा

केंव्हा झाली होतं नुसरत जहांचं लग्न?

कोर्टाने दिलेल्या आदेशात म्हटलंय की, तुर्कीच्या बोडरममध्ये 19 जून 2019 मध्ये झालेलं दोघांचं लग्न कायदेशीर रित्या वैध नाहीये. नुसरत जहाचं हे लग्न प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत राहिलेलं आहे. ही अभिनेत्री खासदार असल्याकारणाने ती चर्चेत असतेच शिवाय तिचं हे लग्न वादग्रस्त ठरल्याने ती अधिकच चर्चेत होती.

हेही वाचा: Video : रोहित-द्रविड नव्या पर्वाची सुरुवात 'युवागीरीनं', व्यंकटेशला संधी

नुसरतच्या मुलाचं काय आहे नाव?

पतीपासून वेगळं झाल्यानंतर नुसरत जहांने आपल्या मुलाला जन्म दिला आहे. त्याचं नाव इशान असं ठेवण्यात आलं आहे. नुसरतच्या मुलाचा पिता कोण आहे, यावरुन अनेक दिवस चर्चा सुरु होत्या. मात्र, नंतर यशदास गुप्ता या मुलाचा पिता असल्याचं समोर आलं.

नुसरत जहांची प्रसिद्धी

नुसरत जहां सोशल मीडियावर खूपच ऍक्टीव्ह आहे. तीचे अनेक फोटो सातत्याने व्हायरल होत असतात. तीला कोट्यवधी फोलोवर्स आहेत. ती सातत्याने आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

loading image
go to top