100 सुपरस्टार एकत्र केले तरी सैफपेक्षा भारी कुणीच नाही

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 21 October 2020

सैफसारखे कुणीच नाही याबद्दल सांगताना ती म्हणते, सेक्रेड गेम्समध्ये त्याने केलेला अभिनय हा कौतूकास्पद आहे. त्य़ाचे काम प्रेक्षकांनी पसंद केले. त्याला चांगलीच वाहवा मिळाली. हे त्य़ाच्या कामाचे यश म्हणावे लागेल. आगामी काळात त्याच्या प्रॉडक्शनमध्य़े काम करावे लागल्यास त्याचे कौतूक तर मला करावेच लागेल.

मुंबई - करिनाने सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यापासून तिचे त्याच्याविषयीचे प्रेम आणखीनच बहरत चालले आहे. वेगवेगळ्य़ा ठिकाणचे फोटो व्हायरल करुन ती त्यानिमित्ताने चर्चेत आली आहे. आता तर तिने सैफच्या अभिनयाचे कौतूक केलं असून 100 सुपरस्टार एकत्र केले तरी त्याची तुलना होऊ शकत नाही असे म्हटले आहे. अर्थात तिच्या या अतीव प्रेमाच्या कौतूकावर नेटक-यांमधून संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

सैफसारखे कुणीच नाही याबद्दल सांगताना ती म्हणते, सेक्रेड गेम्समध्ये त्याने केलेला अभिनय हा कौतूकास्पद आहे. त्य़ाचे काम प्रेक्षकांनी पसंद केले. त्याला चांगलीच वाहवा मिळाली. हे त्य़ाच्या कामाचे यश म्हणावे लागेल. आगामी काळात त्याच्या प्रॉडक्शनमध्य़े काम करावे लागल्यास त्याचे कौतूक तर मला करावेच लागेल. अशी मिश्किल टिप्पणी करिनाने केली आहे.  करिनाला सैफच्या अभिनयाचे कमालीचे कौतूक आहे. एक पती आणि अभिनेता म्हणून तिला त्याचे प्रचंड कौतूक आहे. याविषयी म्हणते, खरं सांगायचे तर त्याच्यासारखे कुणी नाही. त्याच्या बॉलीवूडमधल्या प्रवासाला नुकतीच 25 वर्षे पुर्ण झाली. यानिमित्ताने तिने सैफची स्तुती केली आहे.

सैफच्या निवडीबद्दल ती म्हणाली, तो एक धाडसी अभिनेता आहे. त्यामुळेच मी कायम त्याचे कौतूक करते. म्हणून तर 100 सुपरस्टार होतील पण त्याच्यासारखा कुणी नसेल. तो वेगळ्या पध्दतीने विचार करतो. त्याच्या आवडी निवडी या निश्चितच इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. त्यामुळे तो आणखी प्रभावी ठरतो.

 

करिनाने एका वृत्तपत्राला दिलेल्या सैफविषयी कौतूक केलं आहे. बॉलीवूडमध्ये 25 वर्षे काम केल्यानंतर तो सेक्रेड गेम्ससारख्या मालिकेकडे वळला. तिथे त्य़ाचा वेगळ्या धाटणीचा अभिनय पाहायला मिळाला. प्रेक्षकांची त्याला पसंती मिळाली. या मालिकेने भारताला एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवले. हे आपण सध्या पाहतो आहे. मात्र सध्या आपण या नव्या माध्यमाचा विचार करत नसल्याचे करिनाने सांगितले. 

 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will be hundreds of superstars but never another like him